लंडन : इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेची सारेच जण आतुरतेनेन वाट पाहत आहेत. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाची कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघाला चिंता सतावत आहे ती वेगवान गोलंदाजीची.
भारतीय संघात सध्या मोहम्मद शमी, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हे वेगवान गोलंदाज आहे. पण इंग्लंडमध्ये चेंडू चांगला स्विंग होतो आणि भुवनेश्वर कुमार भारताच्या संघात नाहीत. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला संघात स्थान देण्यात आले असले तरी तो फिटनेसमुळे खेळू शकणार की नाही याबाबत संदिग्धता आहे.
भुवनेश्वरच्या कंबरेला दुखापत झाली आहे. त्यामुळेच त्याला पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आलेल्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. बुमराच्या अंगठ्याला दुखापत झाली असली तरी त्याला संघात स्थान दिले आहे, पण तो कसोटी मालिकेत खेळणार का, याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे हे दोन शिलेदार कधी भारतीय संघाच सामील होणार, याची वाट भारतीय संघ व्यवस्थापन पाहत असेल.