लंडन : पाच सामन्यांची कसोटी मालिका १-३ अशी गमावल्यानंतर शुक्रवारपासून सुरू होणारा अखेरचा सामना जिंकून इंग्लंड दौºयाचा विजयाने निरोप घेण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. त्याचवेळी कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळणारा अनुभवी सलामीवीर अॅलिस्टर कूक याला विजयी निरोप देण्यास इंग्लंड संघ कोणतीही कसर सोडणार नाही.चौथा कसोटी सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतल्याने अखेरचा सामना आता केवळ औपचारिक सामना ठरला आहे. असे असले तरी विराट सेना हा सामना जिंकून इंग्लंड दौºयाचा शेवट सकारात्मकरीत्या करण्यास इच्छुक असेल. यंदाच्या वर्षात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड येथे कसोटी मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे हे विशेष. त्याचवेळी आता अखेरच्या सामन्यातही संघनिवड चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय संघ अखेरच्या सामन्यात नक्कीच बदल करेल हे स्पष्ट आहे.संपूर्ण मालिकेत भारतासाठी सलामी जोडीचे अपयश चिंतेचा विषय ठरला असताना आता अखेरच्या सामन्यात यावर प्रयोग होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला संधी मिळण्याची शक्यता अधिक असून शिखर धवन - लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला संघाबाहेर बसावे लागेल. अनेकांच्या मते सध्या फॉर्ममध्ये असलेल्या १८ वर्षीय पृथ्वीला क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध खेळवले पाहिजे. पृथ्वीचे वय कमी असल्याने तो अपयशी ठरला तरी त्याला पुढे अनेक संधी मिळतील. परंतु, तो अखेरच्या सामन्यात यशस्वी ठरला, तर आगामी आॅस्टेÑलिया दौºयासाठी भारताच्या सलामी जोडीचा प्रश्न काही प्रमाणात निश्चित सुटेल. अष्टपैलू हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याने त्याच्या जागी हनुमा विहारीची वर्णी लागू शकते. हनुमा उपयुक्त फलंदाज असून आॅफ स्पिन मारा करण्यासही सक्षम आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजालाही इंग्लंड दौºयात पहिल्यांदा संधी मिळू शकते. दुखापतग्रस्त असलेल्या रविचंद्रन अश्विनच्या जागी त्याची निवड होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आशिया चषक स्पर्धेसाठी जसप्रीत बुमराहलाही विश्रांती मिळू शकते. असे झाल्यास उमेश यादवचे पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकेल. (वृत्तसंस्था)इंग्लंडसाठी हा सामना भावनात्मक असेल. देशातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असलेला अॅलिस्टर कूक या सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याने त्याला विजयी निरोप देण्यास इंग्लंड पूर्ण प्रयत्न करेल. कूकने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर इंग्लंडने आपल्या संघात कोणताही बदल नसेल असे स्पष्ट केले होते.प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, करुण नायर, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, इशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह.इंग्लंड : जो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कूक, कीटोन जेनिंग्ज, जॉनी बेयरस्टॉ, जोस बटलर, आॅलिवर पोप, मोईन अली, आदिल राशिद, सॅम कुरन, जेम्स अॅण्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स.स्थळ : ओव्हल मैदान. वेळ : दुपारी ३.३० पासून (भारतीय वेळेनुसार)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs England: इंग्लंड दौऱ्याचा शेवट सकारात्मक करण्याचा भारताचा प्रयत्न; अॅलिस्टर कूक शेवटची लढत खेळण्यास सज्ज
India vs England: इंग्लंड दौऱ्याचा शेवट सकारात्मक करण्याचा भारताचा प्रयत्न; अॅलिस्टर कूक शेवटची लढत खेळण्यास सज्ज
पाच सामन्यांची कसोटी मालिका १-३ अशी गमावल्यानंतर शुक्रवारपासून सुरू होणारा अखेरचा सामना जिंकून इंग्लंड दौ-याचा विजयाने निरोप घेण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 2:28 AM