नवी दिल्ली - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएलच्या 11 व्या सत्रामध्ये दिल्लीकडून दमदार कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतला कसोटीमध्ये संधी देण्यात आली. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत असे दोन यष्टीरक्षक संघात आहे. गेल्या दोन वर्षात तळामध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या साहाला डच्चू देण्यात आला आहे. इंग्लंडविरोधात निवडण्यात आलेल्या विराटसेनेत सात फलंदाज, दोन यष्टीरक्षक, तीन फिरकी गोलंदाज, एक अष्टपैलू आणि पाच वेगवान गोलंदाजांचा सामावेश आहे. एक ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा, साहा आणि पार्थिव पटेल यांना वगळण्यात आले आहे.
असा आहे संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव,शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, इशांत शर्मा, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह