भारतीय संघानं चौथ्या कसोटीत १५७ धावांनी विजय मिळवून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. लंच ब्रेकनंतर जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम स्पेलनं सामन्याचे चित्र बदलले अन् इंग्लंडला पराभवाच्या छायेत ढकलले. या सामन्यातही टीम इंडियाचा इंग्लिश फॅन जार्व्हो यानं व्यत्यय आणत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यावर हेडिंग्ले येथे येण्यास आजीवन बंदी घातली गेली आहे. टीम इंडियानं चौथी कसोटी जिंकल्यानंतर जार्व्होनं फेसबूक अकाऊंटवरून जसप्रीत बुमराहसाठी आभार मानणारा मॅसेज पाठवला.
IPL 2021: तयार होतोय नवीन जसप्रीत बुमराह; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडीओ
चौथ्या कसोटीत उमेश यादव गोलंदाजी करत असताना अचानक जार्व्हो खेळपट्टीवर आला अन् गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यानं जॉनी बेअरस्टोला धडक दिली. सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून मैदानाबाहेर काढले. यापूर्वी जार्व्हो लॉर्ड्स कसोटीत क्षेत्ररक्षणाला आला होता, तर हेडिंग्ले येथे रोहित शर्मा बाद झाल्यावर तो फलंदाजाली उतरला होता. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई केली गेली.
भारतानं इतिहास घडवला, पण रवी शास्त्री अन् विराट कोहली यांनी ओढावून घेतली BCCIची नाराजी!
भारतानं ओव्हल येथे ५० वर्षांनंतर कसोटी सामना जिंकला. लंच ब्रेकनंतर जसप्रीतनं ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांचे त्रिफळे उडवले. यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली आणि भारतानं विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली. जार्व्होनं फेसबूकवरून मॅसेज केला की,मी जसप्रीत बुमराहचे आभार मानू इच्छितो. त्यानं जॉनी बेअस्टोला शून्यावर बाद केले. त्यादिवशी हाच जॉनी बेअरस्टो माझ्यावर रागावला होता.''
- परदेशात पहिल्या डावात २००च्या आत संघ गडगडूनही टीम इंडियानं मिळवलेला हा तिसरा विजय ठरला. यापूर्वी २००६मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजवर ४९ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात भारताचा पहिला डाव २०० धावांवर गडगडला होता. २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला डाव १८७ धावांवर गडगडूनही भारतानं तो सामना ६३ धावांनी जिंकला होता.
- कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा ३८ वा कसोटी विजय आहे. ग्रॅमी स्मिथ ( ५३), रिकी पाँटिंग ( ४८) आणि स्टीव्ह वॉ ( ४१) हे विराटपेक्षा अधिक कसोटी विजय मिळवणारे कर्णधार आहेत. परदेशातील विराटचा हा १५ वा कसोटी विजय आहे.
- या सामन्यातील शतकवीर रोहित शर्माला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. रोहितचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३५वे मॅन ऑफ दी मॅच आहे. त्यानं युवराज सिंगचा ( ३४) विक्रम मोडला. सचिन तेंडुलकर ( ७६), विराट कोहली ( ५७), सौरव गांगुली ( ३७) हे आघाडीवर आहेत.