लंडन : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जर भारताच्या कुणा एका खेळाडूने नेत्रदीपक कामगिरी केली असेल तर तो म्हणजे फिरकीपटू कुलदीप यादव. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सहा बळी मिळवत विक्रम रचला होता. दुसऱ्या सामन्यातही त्याने भेदक मारा केला, पण भारताला काही विजय मिळवता आला नाही. या कामगिरीच्या जोरावर कुलदीप आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्यांदाच ' टॉप-10 'मध्ये दाखल झाला आहे.
कुलदीपने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 25 धावांत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. या सहा बळींसह कुलदीपने या मालिकेत एकूण 9 फलंदाजांना बाद केले होते. या कामगिरीच्या कुलदीपने क्रमवारीत आठ स्थानांची झेप घेतली आहे. त्यामुळे कुलदीप आता क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. क्रमवारीत पहिल्यांदाच कुलदीपने पहिल्या दहा जणांमध्ये स्थान पटकावले आहे. अव्वल दहा जणांमध्ये स्थान पटकावणारा कुलदीप हा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.