बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीची चुरस अधिक रंजक होत चालली आहे. जर तरच्या समीकरणावर संघांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे आजच्या भारत-इंग्लंड सामन्यावर पाकिस्तानचा पुढील प्रवास अवलंबून आहे. पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानवर थरारक विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. पण, त्यांच्या मार्गात यजमान इंग्लंडचा अडथळा आहे आणि आज भारताने विजय मिळवल्यास पाकिस्तानचा हा अडथळा दूर होऊ शकतो. त्यामुळेच आजच्या सामन्यात पाकिस्तानी चाहते भारताच्या विजयाची प्रतीक्षा करत आहेत.
पाकिस्तानने 9 गुणांची कमाई करत चौथे स्थान पटकावले आहे. इंग्लंडचे आतापर्यंत आठ गुण आहेत, त्यामुळे त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर साऱ्यांनाच नजरा असतील. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीतील स्थान पक्के करेल. शिवाय इंग्लंडचे आव्हान अधिक खडतर बनणार आहे. त्यांना अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल, पण त्याचवेळी पाकिस्तान पराभूत होण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. पाकिस्तानचा अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे.
त्यामुळे पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही संपूर्ण पाकिस्तान या सामन्यात भारताच्या बाजूने उभा असेल, असा दावा केला आहे. तो म्हणाला,''पाकिस्तानी चाहते भारतीय संघाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानींनाही मी भारताला पाठिंबा देण्याची विनंती करतो. कारण, भारताने इंग्लंडला पराभूत केल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रेवश मिळवू शकेल.''
शोएब अख्तरला शेजारधर्म आठवला; पाक संघासाठी टीम इंडियाकडे विनवणीभारत-इंग्लंड लढतीपूर्वी शोएब अख्तरने एक व्हिडीओ अपलोड केला. तो म्हणाला,''पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देण्यासाठी भारतीय संघ मदत करेल. भारतीय संघाने इंग्लंडला नमवल्यास पाकिस्तानचा मार्ग सोपा होईल.''
इंग्लंडला मागे टाकत पाकिस्तान चौथ्या स्थानावर दाखलअखेरच्या षटकात अफगाणिस्तानवर विजय मिळवत पाकिस्तानने आपले विश्वचषकातील आव्हान कायम ठेवले आहे. कारण या विजयासह पाकिस्तानने 9 गुणांची कमाई करत चौथे स्थान पटकावले आहे. इंग्लंडचे आतापर्यंत आठ गुण आहेत, त्यामुळे त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर साऱ्यांनाच नजरा असतील.