लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाच्या विश्वचषकात भारताला पहिला धक्का बसला तो इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात. या लढतीपूर्वी भारताचा संघ अपराजित होता. पण इंग्लंडने भारताला नमवत विजयाची मालिका खंडीत केली. या पराभवासाठी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांना जबाबदार धरले आहे.
धोनी आणि केदार यांना धारेवर धरताना गांगुली म्हणाला की, " अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि केदार एकेरी-दुहेरी धाव का घेत होते, हे मला समजण्यापलीकडचे होते. कारण भारतीय संघ 338 धावांचा पाठलाग करत होता. त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारायला हवे होते. पण धोनी आणि केदार यांनी मात्र एकेरी-दुहेरी धावांवर समाधान मानले."
: जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला रविवारी अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली परदेशात सलग दहा वन डे सामने जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या भारतीय संघाचा हा पराभव चाहत्यांच्या पचनी पडणारा नाहीच. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर असणाऱ्या इंग्लंड संघाने सर्वोत्तम खेळ केला, हे मान्य करणेही भारतीय चाहत्यांना जड जात आहे. त्यामुळेच पराभवाचे खापर सध्या महेंद्रसिंग धोनीवर फोडले जात आहे. धोनी संथ खेळला, रोहित शर्मा व कर्णधार कोहलीनं भारताला विजयी मार्गावर आणले होते, परंतु धोनीनं सामना गमावला. हातात पाच विकेट असूनही भारताला विजय मिळवण्यासाठी 31 धावा कमी पडल्या.
गांगुली पुढे म्हणाला की, " जेव्हा तुम्ही 338 धावांचा पाठलाग करत असता आणि जेव्हा धावगती 10च्या जवळपास असते, तेव्हा तुम्ही मोठे फटके खेळणे भाग असते. त्यावेळी जर तुम्ही एकेरी-दुहेरी धावा काढत असाल तर तुमची नेमकी मानसीकता काय आहे, हे समजते."डोळ्यासमोर 338 धावांचे लक्ष्य आहे, हे माहित असूनही भारतीय सलामीवीरांनी धडाक्यात सुरुवात केली नाही. सलामीवीर लोकेश राहुल ( 0) माघारी परतल्यानंतर तिसऱ्या षटकात कोहली मैदानावर आला. धावांचा पाठलाग करण्यात सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून धोनी ओळखला जातो. त्यामुळे रोहित शर्मासह तो संघाला विजय मिळवून देईल असा आत्मविश्वास होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. या दोघांनी जवळपास 25 षटकं खेळून काढली. या जोडीनं जवळपास 5.30 च्या सरासरीनं धावा केल्या. त्यापाठोपाठ रोहितही शतक झळकावून माघारी परतला. कोहली बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 9.55च्या सरासरीनं धावा करण्याची आवश्यकता होती.