ठळक मुद्देचौथ्या डावात फलंदाजी करताना गावस्कर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताच्या लोकेश राहुलला एक नवा विक्रम खुणावत होता. पण 149 धावांवर बाद झाल्याने राहुलला हा विक्रम मोडता आला नाही.
ओव्हल या मैदानातच भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी 1979 साली दुसऱ्या डावात 221 धावांची खेळी साकारली होती. हा विक्रम मोडण्याची संधी राहुलला होती. पण चौथ्या डावात फलंदाजी करताना गावस्कर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.