Join us  

India vs England : टीम इंडियाला आणखी एक धक्का, सरावात सलामीवीराच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् त्याला घ्यावी लागली माघार!

India vs England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान यांनी दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावरून माघार घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 6:59 PM

Open in App

India vs England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान यांनी दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावरून माघार घेतली. त्यांना बदली खेळाडू म्हणून निवडलेले पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव हे कोरोना पॉझिटिव्ह कृणाल पांड्याच्या संपर्कात आले अन् आता पहिली कसोटी सुरू होण्यास २ दिवस शिल्लक असताना सरावादरम्यान टीम इंडियाच्या सलामीवीराच्या डोक्यावर चेंडू आदळला. त्यामुळे त्यानं पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. उप कर्णधार अजिंक्य रहाणेनं सांगितले की, सरावात मयांक अग्रवाल याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् त्याच्यावर बीसीसीआयची वैद्यकीय टीम लक्ष ठेऊन आहे. त्यानंतर बीसीसीआयनं ट्विट करून मयांकनं पहिल्या कसोटीतून माघार घेतल्याचे जाहीर केले.  ( Mayank Agarwal ruled out of the first Test against England after getting hit on the head in the nets) 

रोहित सोबत सलामीला काय पर्याय?शुबमन गिल आधीच बाहेर पडल्यामुळे टीम इंडियाला सलामीसाठी मर्यादित पर्याय उपलब्ध असताना हा आणखी एक धक्का बसला. मयांकनं माघार घेतल्यामुळे अन् पृथ्वी शॉ अजूनही इंग्लंडमध्ये दाखल न झाल्यामुळे रोहित शर्मासोबत पहिल्या कसोटीत सलामीला कोण खेळेल हा प्रश्न पडला आहे. लोकेश राहुल हा पर्याय समोर उभा राहत आहे. लोकेशनं तीन दिवसांच्या सराव सामन्यात शतकी खेळी झकळावली होती. हनुमा विहारी याचाही विचार केला जाऊ शकतो. 

भारतीय संघ - रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मह सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा, अभिमन्यू इस्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.  राखीव खेळाडू - प्रसिद्ध कृष्णा, अर्झान नागवासवाला

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडमयांक अग्रवालशुभमन गिलरोहित शर्मालोकेश राहुल
Open in App