Rishabh Pant Champagne Gift to Ravi Shastri : भारताने मालिका जिंकली, पण रवी शास्त्री यांची 'चांदी' झाली; रिषभ पंतने गुपचूप शॅम्पेनची बॉटल दिली, Video 

Rishabh Pant Champagne Gift to Ravi Shastri : भारतीय संघाने वन डे मालिका जिंकल्यानंतर रिषभ पंत व विराट कोहली यांनी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रिट दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 10:23 AM2022-07-18T10:23:03+5:302022-07-18T10:23:35+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, ODI Series : After winning ODI series Rishabh Pant gifts his MAN OF the Match Champagne bottle to Ravi Shastri, Video | Rishabh Pant Champagne Gift to Ravi Shastri : भारताने मालिका जिंकली, पण रवी शास्त्री यांची 'चांदी' झाली; रिषभ पंतने गुपचूप शॅम्पेनची बॉटल दिली, Video 

Rishabh Pant Champagne Gift to Ravi Shastri : भारताने मालिका जिंकली, पण रवी शास्त्री यांची 'चांदी' झाली; रिषभ पंतने गुपचूप शॅम्पेनची बॉटल दिली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rishabh Pant Champagne Gift to Ravi Shastri : भारतीय संघाने वन डे मालिका जिंकल्यानंतर रिषभ पंतविराट कोहली यांनी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रिट दिली. भारताने तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवताना मालिका २-१ अशी जिंकली. ८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. रिषभ पंत ( Rishabh Pant) व हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हे या विजयाचे शिल्पकार ठरले. टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याचं जंगी सेलिब्रेशनही केलं आणि यात रवी शास्त्रींची चांदी झाली. विराटने गुपचूप त्यांना शॅम्पेन हवी आहे का विचारलं, तर रिषभने तर मॅन ऑफ दी मॅचसाठी मिळालेली शॅम्पेन शास्त्रींनी भेट दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नाबाद १२५ धावा आणि हार्दिक पांड्यासह ( Hardik Pandya) १३३ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. हार्दिकने ( ४-२४  व ७१ धावा) अष्टपैलू कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून विजय मिळवताना मालिका २-१ अशी खिशात घातली. ८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली आहे.  हार्दिक व रिषभ यांची ११५ चेंडूंवरील १३३ धावांची पाचव्या विकेट्सची भागीदारी ब्रेडन कार्सने संपुष्टात आणली. हार्दिक ५५ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला. रिषभने ११३ चेंडूंत १६ चौकार व २ षटकारांसह नाबाद १२५ धावा केल्या.   

रिषभला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले, तर हार्दिक पांड्या मॅन ऑफ दी सीरिज ठरला. यावेळी SkySports साठी समालोचन करणाऱ्या रवी शास्त्री यांना रिषभने गुपचूप शॅम्पेनची बॉटल जाऊन दिली.  


८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली. १९९०मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने २ ची वन डे मालिका २-० अशी जिंकली होती आणि त्यानंतर २०१४मध्ये महेंद्रसिंग धोनीने ३-१ अशा मालिकाविजयासह २४ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर इंग्लंडमध्ये मालिका विजयासाठी ८ वर्ष प्रतीक्षा करावी लागली.

Web Title: India vs England, ODI Series : After winning ODI series Rishabh Pant gifts his MAN OF the Match Champagne bottle to Ravi Shastri, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.