Join us  

Big Blow : टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्या वन डेत दुखापतग्रस्त झालेल्या फलंदाजाची मालिकेतून माघार, IPL 2021लाही मुकणार?

India vs England, ODI series : भारतीय संघानं पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडला पराभवाची चव चाखवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 3:38 PM

Open in App

India vs England, ODI series : भारतीय संघानं पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडला पराभवाची चव चाखवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, टीम इंडियाला बुधवारी मोठा धक्का बसला. मंगळवारी झालेल्या या सामन्यात श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांना दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. दोघही क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरले नाही. त्यात अय्यरला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार अय्यरनं उर्वरित मालिकेतून (  Shreyas Iyer has been ruled out of remaining of the ODI series against England) माघार घेतली आहे. BCCIनं अजूनही अधिकृत ट्विट केलेले नाही.  आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, अक्षर पटेलनं लगेच आभार मानले भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma won't take the field ) याला फलंदाजी करताना उजव्या हाताच्या कोपऱ्याला चेंडू लागला. तरीही त्यानं फलंदाजीत २८ धावांचं योगदान दिलं. पण, त्याला दुखापतीमुळे मैदानावर क्षेत्ररक्षणाला येता आलं नाही. इंग्लंडच्या डावाच्या ८व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तो या सामन्यात मैदानावर उतरू शकणार नसल्याचे BCCIनं स्पष्ट केलं. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅनचा रिपोर्ट आल्यावर समजेल. पण बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार अय्यरने मालिकेतून माघार घेतली आहे. ICC Ranking : ट्वेंटी-20 क्रमवारीत विराट कोहलीची आगेकूच, पण वन डे क्रमवारीत रोहित शर्माला बसला धक्काआयपीएल २०२१ लाही मुकणार, रिषभ पंतकडे नेतृत्व सोपवणार?श्रेयसची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे वृत्त समोर येत आहे आणि तो आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला जवळपास दोन महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.  श्रेयस अय्यर आयपीएलच्या मागील ३ पर्वात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. २०१९मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघानं प्ले ऑफमध्ये मजल मारली आणि मागच्या वर्षी संघ प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करू शकला. तज्ज्ञांच्या मते खांद्याचं हाड सरकलं असेल, तर ते ठिक होण्यासाठी सहा आठवडे लागू शकतात आणि शस्त्रक्रिया झाली तर हा कालावधी अजून वाढू शकतो. अशात ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलला तो मुकण्याची शक्यता आहे. अशात रिषभ पंतकडे दिल्लीचे नेतृत्व सोपवण्यात येईल. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघदिल्ली कॅपिटल्सआयपीएल