India vs England : भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी रोमहर्षक झाली. दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये मैदानावर शाब्दिक खटकेही उडालेले पाहायला मिळाले. टीम इंडियातील खेळाडूंनी इंग्लंड गोलंदाज ऑली रॉबिन्सन ( Ollie Robinson) याला टार्गेट केलेले पाहायला मिळाले. रॉबिन्सननं गोलंदाजी करताना भारताच्या जसप्रीत बुमराहला सतावले होते. रॉबिन्सन जेव्हा मैदानावर आला तेव्हा मोहम्मद सिराजनं त्याच्याकडे डोळे वटारले होते.
लिओनेल मेस्सीचे कोट्यवधींचे अश्रू; ज्या टीशू पेपरनं पुसले डोळे तो विक्रिला, जाणून घ्या किंमत
तेच आणखी एक वृत्त समोर येत आहे. ऑली रॉबिन्सन फलंदाजीसाठी मैदानावर येत असताना भारताच्या दोन राखीव खेळाडूंनी काही सेकंदासाठी त्याची वाट अडवली होती. The Guardianनं दिलेल्या वृत्तानुसार, ऑली रॉबिन्सन जेव्हा पॅव्हेलियनच्या पायऱ्यांवरून खाली येत होता तेव्हा भारताचे दोन राखीव खेळाडू विरुद्ध दिशेनं पॅव्हेलियनकडे जात होते. तेव्हा रॉबिन्सन थांबला अन् भारतीय खेळाडू एकाबाजूला होतील याची वाट पाहत होता. पण, ते रॉबिन्सनच्या मार्गातून हटले नाही. रॉबिन्सन काही न बोलता त्या दोघांच्या जाण्याची वाट पाहत उभा राहिला, परंतु या दोन्ही खेळाडूंच्या मनात काही तरी वेगळेच होते आणि ते रॉबिन्सनच्या मार्गात काही सेकंदासाठी उभेच राहिले व त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होते.
खराच असा प्रसंग घडला का, याबबातचा खुलासा अजून झालेला नाही. भारतानं लॉर्ड्स कसोटीत १५१ धावांनी विजय मिळवला. भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं ३९१ धावा केल्या. भारतानं दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित करून इंग्लंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांची शतकी भागीदारी आणि जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्या नाबाद ८९ धावा यांनी भारताचा डाव सावरला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांवर गडगडला.