नॉटिंगहॅम - इंग्लंडविरूद्घच्या पहिल्या वन डेतील विजयाचा शिल्पकार कुलदीप यादव याच्यावर भारताचा कर्णधार विराट कोहली भलताच खुश झाला आहे. कारकीर्दितील सर्वोत्तम कामगिरी करणा-या कुलदीपवर विराट कौतुकांचा वर्षाव करत आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानेही कुलदीपच्या फिरकीवर खेळणे आव्हानात्मक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
फिरकी गोलंदाजांपुढे इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर जम बसवणे कठीण जात आहे आणि याची विराटलाही कल्पना आलेली आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विराट ट्रमकार्ड म्हणून कुलदीप आणि युझवेंद्र चहल यांचा वापर करू शकतो. या दोघांनी टी-20 पाठोपाठ वन डे सामन्यांत आपली छाप पाडली आहे. कुलदीपच्या नावे दोन कसोटी सामने आहेत. तर चहलने एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला की, आम्ही चांगली कामगिरी केली. कुलदीपच्या गोलंदाजीला तोड नाही, मागील काही वन डे सामन्यांत यापेक्षा चांगली गोलंदाजी मी पाहिलेली नाही. त्याने आत्मविश्वाने गोलंदाजी करावी, अशी आमची इच्छा आहे. कारण तो आमचा मॅचविनर गोलंदाज आहे.
कसोटी त्याला संधी मिळेल का, या प्रश्नावर विराट म्हणाला, कसोटी संघात तुम्हाला धक्का देणारी नाव असू शकतात. कसोटी संघाच्या घोषणेसाठी अद्याप बराच वेळ बाकी आहे. कुलदीपच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांना चाचपडताना पाहून आम्ही कसोटीत त्याचा विचार करू शकतो.
Web Title: India VS England One Day: Kuldeep Yadav's gift from Virat Kohli?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.