लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात लोकेश राहुल आणि रीषभ पंत या जोडीने धडाकेबाज फलंदाजी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचली असून एक विक्रम मोडीत काढला आहे.
राहुलने 149 धावांची दमदार खेळी साकारली, तर पंतने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा पंत हा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचत एक नवी विक्रम रचला आहे. यापूर्वी भारताच्या सहाव्या विकेटसाठीचा विक्रम करुण नायर आणि आर. अश्विन यांच्या नावावर होता. 2016 साली झालेल्या दोन्ही देशांच्या कसोटी सामन्यात नायर आणि अश्विन या जोडीने 181 धावांची भागीदारी रचली होती. हा भागीदारीचा विक्रम पंत आणि राहुल या दोघांनी मोडीत काढला आहे.