ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन फक्त युवा खेळाडूंनाच टीम इंडियात संधी दिली जावी का, या चर्चेत महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं ( Sachin Tendulkar) उडी घेतली आहे. भारतीय संघ निवडताना प्रत्येकवेळी वय हा क्रायटेरिया असूच शकत नाही, असे मत सचिननं व्यक्त केलं. तो म्हणाला,''फक्त युवा खेळाडूंनाच निवडा, याबाबत मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. क्षमता असलेल्या खेळाडूला खेळवलं गेलंच पाहिजे. भारतीय क्रिकेट संघाबद्दल बोलत असताना वय हा क्रायटेरिया ठेवू शकत नाही. तुम्ही संघाच्या विजयासाठी काय योगदान देता, हे महत्त्वाचे आहे आणि तेव्हा वय जास्त महत्त्वाचे ठरत नाही. जर एखाद्या खेळाडूकडे चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे आणि तो कदाचित युवा क्रिकेटपटू नसेल, तरीही त्याला खेळवले गेले पाहिजे.'' तू टीम इंडियाची नाही, तर स्वतःच्या संघाची इभ्रत काढतोस; वासिम जाफरचे मायकेल वॉनला सडेतोड उत्तर
''युवा खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही चांगली कामगिरी केली, तर तुम्हाला संघात स्थान मिळायलाच हवं. पण, तो कामगिरी करण्यात अपयशी ठरला, तर त्याला पर्याय शोधायला हवा. हा फक्त वयाचा विषय नाही, तर युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी, याबाबतचा हा गैरसमज आहे. आपण सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड करायला हवी, असं मला वाटतं. आपण १४-१५ सर्वोत्तम खेळाडूंची निवड करतो आणि निवड समितीला संघाला काय हवंय, हे चांगलं माहित असतं. त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावरच राहुद्या,''असेही तेंडुलकर म्हणाला. विराट कोहलीला दुखापत?; संघ अडचणीत असताना अखेरच्या षटकांत मैदान का सोडलं, समोर आलं कारण!
सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी केलं प्रभावीतइंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत तेंडुलकरला सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोन खेळाडूंनी प्रभावीत केलं. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये टॉप गोलंदाजांचा सामना करण्याची संधी मिळत असल्यानं युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांत आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार होतात, असेही तेंडुलकरला वाटते. तो म्हणाला,''सूर्यकुमार आणि इशान या दोघांनी चांगली कामगिरी केली आहे. या दोघांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंचा आयपीएलमध्ये अनेकदा सामना केला आहे. आम्ही जेव्हा पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचो, तेव्हाच प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा सामना करायचो आणि तोही थेट आंतरराष्ट्रीय सामन्यात. पण, आता आयपीएलमुळे या युवा खेळाडूंना जगातील टॉप खेळाडूंसोबत खेळण्याची व शिकण्याची संधी मिळतेय.'' IND vs ENG, ODI Team : वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी