India vs England playing XI: भारतीय संघानं पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडला जवळपास पराभवाचे पाणी पाजलेच होते, परंतु पावसानं तसं होऊ दिले नाही. भारताला पाचव्या दिवशी विजयासाठी १५७ धावांची गरज होती आणि ९ फलंदाज हाताशी होते. पण, पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ झालाच नाही आणि टीम इंडियाची मालिकेत आघाडी घेण्याची संधीही गेली. पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार जो रूटनं ( Joe Root) दोन्ही डावांत दमदार खेळ केला. उभय संघांमध्ये दुसरा कसोटी सामना उद्यापासून लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे आणि टीम इंडिया उंचावलेल्या मनोबलानं मैदानावर उतरण्यास सज्ज आहे. पण, या कसोटीपूर्वी दोन्ही संघांना दुखापतीचे ग्रहण लागले आहे आणि भारतासाठी तर हा मोठा धक्का आहे. ( Injury scare for both teams ahead of Lord’s Test)
भारतानं पहिल्या कसोटीत आर अश्विन व इशांत शर्मा यांना बाकावर बसवले होते आणि शार्दूल ठाकूर व मोहम्मद सिराज यांना खेळवले होते. ठाकूर व सिराज यांनी चांगली कामगिरी करून दाखवली, परंतु दुसऱ्या कसोटीपूर्वी शार्दूलला दुखापत झाली असून त्याचे खेळणे अनिश्चित आहे. त्याच्या दुखापतीमुळे आर अश्विनला दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे. ( Shardul Thakur a doubtful starter for Lord's Test due to hamstring injury. Ravi Ashwin likely to replace him). इंग्लंड संघालाही दुखापतीचा धक्का बसला आहे. प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला दुखापत झाली आहे आणि त्याच्या जागी मार्क वूड खेळणार आहे. India vs England 2nd Test Live
मोईन अलीचा समावेश...
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडनं अष्टपैलू खेळाडू मोईन अली याचा संघात समावेश केला आहे. त्यामुळे त्याचे अंतिम ११मध्ये खेळणे निश्चित आहे. शिवाय हसीब हमीद यालाही संघात खेळवले जाईल त्याच्यासाठी झॅक क्रॅवलीला डच्चू मिळू शकतो. डॅन लॉरेन्स किंवा डॉमिनिक सिब्ली यांच्यापैकी एकाला बाकावर बसवून मोईन अलीला संघात खेळवले जाईल. India vs England 1st Test, Ind vs Eng 2nd Test live
इंग्लंडचा संभाव्य संघ ( England Playing XI) - रोरी बर्न्स. डॉमिनिक सिब्ली/ऑली पोप, झॅक क्रॅवली/हसीब हमीद, जो रूट, जॉनी बेअरस्टो, डॅनीएल लॉरेन्स/मोईन अली, जोस बटलर, सॅम कुरन, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड/मार्क वूड, जेम्स अँडरसन
भारताचा संभाव्य संघ ( India Playing XI) - रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर/इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह ( Rohit Sharma, KL Rahul, Cheteshwar Pujara, Virat Kohli (c), Ajinkya Rahane, Rishabh Pant (wk), Ravindra Jadeja, Shardul Thakur/ Ishant Sharma, Mohammed Shami, Mohammed Siraj, Jasprit Bumrah)
Web Title: India vs England playing XI: Shardul Thakur, Stuart Broad suffer injuries ahead of Lord’s Test, Injury scare for both teams
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.