IND vs ENG: ODI मालिकेआधीच विराटची मोठी घोषणा, 'हे' दोन खेळाडू करणार ओपनिंग!

Virat Kohli On Team India Opening: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं टीम इंडियाच्या सलामीजोडीबाबत मोठी माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 06:24 PM2021-03-22T18:24:04+5:302021-03-22T18:24:46+5:30

whatsapp join usJoin us
india vs england rohit sharma and shikhar dhawan opening against england odi series says virat kohli | IND vs ENG: ODI मालिकेआधीच विराटची मोठी घोषणा, 'हे' दोन खेळाडू करणार ओपनिंग!

IND vs ENG: ODI मालिकेआधीच विराटची मोठी घोषणा, 'हे' दोन खेळाडू करणार ओपनिंग!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England: कसोटी आणि टी-२० मालिकेनंतर आता भारत विरुद्ध इंग्लंड अशी एकदिवसीय मालिका देखील रंगणार आहे. पुण्यात खेळविण्यात येणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २३ मार्च रोजी होणार आहे. त्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं टीम इंडियाच्या सलामीजोडीबाबत मोठी माहिती दिली आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा भारतीय संघाची सुरुवात करतील, अशी माहिती कोहलीनं दिली आहे. (rohit sharma and shikhar dhawan opening against england odi series)

भारतीय संघ जवळपास तीन महिन्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. याआधी भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कांगारुंविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली होती. यात भारताचा २-१ नं पराभव झाला होता. या मालिकेत केएल राहुल आणि शिखर धवन यांनी भारतीय संघाची सुरुवात केली होती. रोहित शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नव्हता. 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत रोहित शर्मा आणि शिखर धवन भारतीय संघाची सुरुवात करतील, असं कोहलीनं प्रसार माध्यमांशी बोलताना जाहीर केलं आहे. यासोबतच सूर्यकुमार यादव याला संघात सामील करुन घेण्याबाबतचा विचार केला जात असल्याचं तो म्हणाला. 

"मैदानात कोणत्या कॉम्बिनेशननं उतरावं यात जशी निवड समितीची कोणतीही भूमिका नसते. त्याच पद्धतीनं संघ निवडीच्याबाबतीत संघ व्यवस्थापनाचा कोणताही सहभाग नसतो. कुणी कोणत्या स्थानावर फलंदाजीला उतरावं हे परिस्थितीपाहून ठरवलं जातं", असं कोहली म्हणाला. 

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाची सलामीची जोडी सतत बदलताना पाहायला मिळाली होती. पाच सामन्यांमध्ये भारतीय संघानं चारवेळा सलामीच्या जोडीत वेगवेगळे बदल करुन पाहिले होते. पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि केएल राहुनं सुरुवात केली होती. तर दुसऱ्या सामन्यात केएल राहुल आणि इशान किशन सलामीला उतरले होते. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात रोहित आणि केएल राहुलनं सलामीसाठी फलंदाजी केली होती. तर पाचव्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली होती. 
 

Web Title: india vs england rohit sharma and shikhar dhawan opening against england odi series says virat kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.