कोरोनाचं संकट संपलेलं नाही. त्यामुळे क्रिकेट सामने जरी सुरू झाले असले तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुनच खेळाडूंना खेळावं लागत आहे. संघातील खेळाडूंना सुरक्षित ठेवण्याचं आव्हान देखील संघ व्यवस्थापनावर आहे. त्यामुळे बायो बबलमध्येच राहून खेळाडूंवर त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी बंधन घालण्यात आली आहेत. यात खेळाडूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर आणि प्रत्येक सामन्याआधी कोरोनाची चाचणी घेतली जातेय.
भारतीय संघ आता पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सामोरा जात आहे. यात भारतीय संघानं पहिल्या सामन्यात विजय देखील नोंदवला आहे. याच दरम्यान भारतीय संघ पुण्यात आल्यानंतर खेळाडूंची कोरोना चाचणी देखील घेण्यात आली. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्याआधी देखील खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. वारंवार होणाऱ्या कोरोना चाचणीमुळे खेळाडूंना त्रास होतो. त्यात बायो बबलच्या नियमानुसार खेळाडूंना कुणाला भेटताही येत नाही. या सर्व गोष्टींना कुणी वैतागलं नाही, तर नवलच. अशीच काहीशी अवस्था टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माची झाली आहे.
रोहित शर्माच्या कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात येत असताना भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत यानं एक गमतीशीर व्हिडिओ शूट केला. यात स्वॅब घेऊन झाल्यानंतर रिषभ पंतनं रोहितला मिश्किलपणे विचारलं की कसं वाटतंय भावा? त्यावर रोहितनं गंमतीनं मधलं बोट दाखवून खिल्ली उडवली.
रिषभ पंतनं शूट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या प्रचंड व्हायरल होत असून चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
दरम्यान, भारतीय संघानं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ६६ धावांनी दमदार विजय प्राप्त केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० नं आघाडी घेतली आहे. सामन्यात रोहित शर्माला फलंदाजी करताना दुखापत देखील झाली होती. इंग्लंडचा मार्क वुडनं टाकलेला चेंडू रोहित शर्माच्या हाताला लागला होता. त्यामुळे रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाहीय.
Web Title: india vs england Rohit Sharma Gave Funny Answer To Rishabh Pant after corona test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.