मुंबई - भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागने भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याबद्दल महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला 3-2 अशी पराभवाची चव चाखवेल असे विधान सेहवागने केले आहे. 'इंग्लंडला त्यांच्या भूमीत कसोटीत मालिकेत पराभूत करणे आव्हानात्मक आहे, परंतु अशक्य नाही,' असे सेहवागने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-2 असा पिछाडीवर आहे. भारताला पहिल्या कसोटीत 31 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या कसोटीत भारतावर एक डाव व 159 धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली. मात्र तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने जोरदार कमबॅक केले. संघाने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाडींवर दमदार कामगिरी करताना विजय मिळवला.
चौथ्या सामन्यात भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे, परंतु इतक्या सहजासहजी इंग्लंडचा संघ ती संधी देणार नाही, असेही सेहवाग म्हणाला. त्याने सांगिलते, फक्त खेळाडूच नाही, तर देशातील प्रत्येक व्यक्तीचा विराट कोहलीवर विश्वास आहे. विराटने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावीत केले आहे. पुढीत कसोटीतही त्याच्याकडून खोऱ्याने धावा होत रहाव्या, अशी अपेक्षा आहे.
या मालिकेत कोहलीने सर्वाधिक 440 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टोने 206 धावा केल्या आहेत. भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात हार्दिक पांड्या 160 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
Web Title: India vs England: Sehwag's prediction about England Test series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.