Join us  

India vs England : धक्कादायक... अॅलिस्टर कुकने जाहीर केली निवृत्ती

Alastair Cook Retirement: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत दमदार कामगिरी करता आली नाही म्हणून इंग्लंडचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 4:36 PM

Open in App
ठळक मुद्देकुकच्या निवृत्तीच्या बातमीमुळे सचिनचे चाहते काहीसे सुखावले आहेत.

लंडन : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत दमदार कामगिरी करता आली नाही म्हणून इंग्लंडचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या कसोटी विक्रमांच्या जवळ कुक पोहोचला होता. त्यामुळे सचिनचे विक्रम आता कुक मोडणार असे वाटले होते. पण कुकच्या निवृत्तीच्या बातमीमुळे सचिनचे चाहते काहीसे सुखावले आहेत.  भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यानंतर कुक निवृत्ती पत्करणार आहे. त्यामुळे आपल्या अखेरच्या सामन्यात कुक कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान कुकने पटकावला आहे. कुकच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 12, 254 धावा आहेत.

 

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने व्यक्त केलेली प्रतिक्रीया वाचा

 

टॅग्स :अॅलिस्टर कुकभारत विरुद्ध इंग्लंड