India vs England, 2nd Test, Chennai : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (A Chidambaram Stadium) वर सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात खेळपट्टीवरुन जोरदार वाद सुरू आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी खेळपट्टीवर चेंडू वळताना पाहायला मिळाल्यानंतर इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. पण आज कॉमेंट्री बॉक्समध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Sunil Gavaskar Slams Argument Of Criticising The Chennai Pitch)
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने मजबूत पकड निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत कॉमेंट्री बॉक्समधून सुनील गावस्कर यांनी खेळपट्टीला दोष देणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. "काही जण नेहमी तक्रारीरच करत असतात. इंग्लंडमध्ये अशा खेळपट्ट्या तयार केल्या जातात. ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्य ४६ धावांमध्ये गारद होतो. तेव्हा इंग्लंडचे कुणी खेळाडू खेळपट्टीवर टीका करत नाहीत. पण भारताच्या खेळपट्ट्यांवर नेहमी टीका केली जाते. लोकांना इथंच त्रास व्हायला सुरू होतो काय?", असं गावस्कर म्हणाले.
कॉमेंट्री बॉक्समध्ये आज गावस्कर हे भलत्याच मूडमध्ये पाहायला मिळाले. इंग्लंडकडून केल्या जाणाऱ्या टीकांवर गावस्कर यांना एकावर एक शाब्दीक 'बाऊन्सर्स' टाकले. काही वेळा खिल्ली देखील उडवली. गावस्करांचं हे रुप पाहून क्रिकेट चाहत्यांमध्येही एकच चर्चा सुरू झाली आणि सामना भारत विरुद्ध इंग्लंड पण चर्चा मात्र सुनील गावस्करांच्या कॉमेंट्रीची अशी अवस्था झालीय. सुनील गावस्कर ट्विटवरही टॉप ट्रेंडमध्ये आले आहेत.
चेंडू सरळ यायला हवे असतील तर घरी खेळाकसोटीच्या पहिल्याच दिवशी चेंडू वळत असल्यानं टीका करणाऱ्यांना गावस्करांनी जोरदार टोला हाणला. "चेन्नईची खेळपट्टी खेळण्यालायक नाही असं अजिबात नाहीय. आव्हानात्मक खेळपट्टी आहे या अर्थानं त्याकडे पाहायला हवं. याच खेळपट्टीवर रोहितनं दिडशे धावा केल्या आणि अश्विनसारखा गोलंदाजही अर्धशतकी खेळी साकारतोय. त्यामुळे काहीजण नुसत्या तक्रारी करत असतात. त्यामुळे बॅटवर सरळ चेंडू यायला हवे असतील त्यांना आपल्या घरी जाऊन कोणत्याही स्थानिक क्रिकेट अकादमीत खेळावं", असा जोरदार टोला गावस्कर यांनी हाणला आहे.
स्टुअर्ट ब्रॉड खेळतोय? गावस्करांनी उडवली खिल्लीइंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्याकडून इंग्लंडकडून खूप कमी गोलंदाजी करुन घेतली जात आहे. यावरही गावस्कर यांनी आपल्या हटके शैलीत टोमणा लगावला. बऱ्याच कालावधीनंतर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटनं वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला गोलंदाजी दिल्यावर कॉमेंट्री बॉक्समध्ये एका समालोचकानं स्टुअर्ट ब्रॉड याला आता गोलंदाजी करायला दिली जातेय असं सांगितलं. त्यावर सुनील गावस्कर यांनी "स्टअर्ट ब्रॉड? तो खेळतोय?" असा खोचक सवाल उपस्थित करत इंग्लंडची खिल्ली उडवली.