India vs England: लिड्स कसोटीत टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आली आहे. लॉर्ड्सवर विजय मिळवून आनंदात असणाऱ्या विराट कोहली अँड कंपनीला तिसऱ्या कसोटीत इंग्लंडनं जमिनीवर आदळले. जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं तिसरी कसोटी १ डाव व ७६ धावांनी जिंकली. भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीला २ सप्टेंबरपासून ओव्हल येथे सुरूवात होणार आहे आणि दोन्ही संघ तेथे दाखल झाले आहेत. या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या ताफ्यात ख्रिस वोक्स, सॅम बिलिंग आणि मार्क वूड हे तगडे खेळाडू परतले आहेत आणि त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. अशात केनिंग्टन ओव्हल येथील कसोटी सामन्यांचा इतिहास टीम इंडियाच्या विरोधात आहे.
बीसीसीआय होणार मालामाल, IPL 2022 तून कमावणार ५००० कोटी; नव्या संघासाठी मागताऐत २००० कोटी!
चौथ्या कसोटीत टीम इंडिया कोणत्या बदलांसह मैदानावर उतरणार याची सर्वांना उत्सुकता आहे. तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. त्याच्या खेळण्याबाबद प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यताही बळावली आहे. इशांत शर्माच्या जागी शार्दूल ठाकूरही खेळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विराट कोहलीला अंतिम ११ फायनल करण्यापूर्वी नीट विचार करावा लागणार आहे, कारण भारतीय संघाचा ओव्हलवरील इतिहास फार चांगला नाही. १९७१ मध्ये भारतानं येथे एकमेव विजय मिळवला आहे. भारतानं १३ सामन्यांत पाच सामने गमावले आहेत आणि सात अनिर्णित निकाल लागले आहेत. २००७, २०१४ व २०१८ या मागिल तीनही मालिकांमधील ओव्हलवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे.