IND vs ENG: शानदार..जबरदस्त..जिंदाबाद! रोमांचक लढतीत भारताचा ७ धावांनी विजय; मालिका खिशात

India vs England, Indian Won By 7 Runs: इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील रोमांचक लढतीत भारतीय संघानं ७ धावांनी विजय प्राप्त केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 10:29 PM2021-03-28T22:29:48+5:302021-03-28T22:30:19+5:30

whatsapp join usJoin us
india vs england team india won by 7 runs and takes series by 2 1 | IND vs ENG: शानदार..जबरदस्त..जिंदाबाद! रोमांचक लढतीत भारताचा ७ धावांनी विजय; मालिका खिशात

IND vs ENG: शानदार..जबरदस्त..जिंदाबाद! रोमांचक लढतीत भारताचा ७ धावांनी विजय; मालिका खिशात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 3rd ODI, Pune: इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील रोमांचक लढतीत भारतीय संघानं ७ धावांनी विजय प्राप्त केला आहे. भारतीय संघानं विजयासह तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ नं जिंकली आहे. सॅम कुरनच्या तडाखेबाद ९५ धावांच्या खेळीमुळं सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावांची गरज असताना टी. नटराजननं अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला ७ धावांनी विजय प्राप्त करुन दिला आहे. 

एकदम कडक! कर्णधार कोहलीनं चित्त्याच्या चपळाईनं टिपला अफलातून झेल; पाहा Video

इंग्लंडकडून सॅम कुरननं सर्वाधिक नाबाद ९५ धावा केल्या. इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतलेला असताना सॅम कुरनने मैदानात जम बसवत संघाला सावरलं होतं. भारतीय संघ सामन्यावर पकड मिळवलेली असतानाच सॅम कुरननं आपल्या भात्यातील खणखणीत फटक्यांचा नजराणा पेश करत सामन्याचं रुप पालटून टाकलं होतं. त्यामुळे अखेरच्या षटकापर्यंत सामना पोहोचला. पण सॅम कुरनला सहकारी खेळाडूंकडून साथ मिळाल्यानं त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. भारतीय संघानं सामन्यात कोणतीही घाई न करता अतिशय कठीण प्रसंगातही संयमी खेळी करत इंग्लंडच्या फलंदाजांना माघारी धाडलं आणि सामन्यावर पकड निर्माण केली. भारतीय संघाकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारनं इंग्लंडच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं. टी नटराजननं एक विकेट घेतली. 

हार्दिकनं भर सामन्यात हात जोडून मैदानात बसून सर्वांची माफी मागितली, नेमकं काय घडलं? पाहा Video

भारतीय संघाकडून सुटले चार झेल
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आदिल रशीदचा अफलातून झेल टिपला. पण दुसऱ्या बाजूला इतर खेळाडूंकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हार्दिक पंड्याकडून सामन्यात सहज टिपता येतील असे दोन झेल सुटले. तर टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांच्याकडून मोक्याच्या क्षणी झेल सुटल्यामुळे सामन्यात एका क्षणाला भारतीय चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.  

शार्दुलनं ठोकलेला षटकार पाहून बेन स्टोक्स अवाक्; थेट शार्दुलची बॅटच तपासली!

इंग्लंडची निराशाजनक सुरुवात
भारतीय संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक राहिली. भुवनेश्वर कुमारनं पुन्हा एकदा आपल्या स्विंगच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भुवीनं पहिल्याच षटकात जेसन रॉयला माघारी धाडलं. त्यानंतर जॉन बेअरस्टो देखील स्वस्तात बाद केलं आणि भारतीय संघाला मोठं यश मिळवून दिलं. त्यानंतर डेव्हिड मलान यांनी चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मलान यानं अर्धशतकी खेळी साकारली. पण त्याला साजेशी साथ मिळू शकली नाही. कर्णधार जोस बटलरला शार्दुल ठाकूरनं १५ धावांवर पायचीत केलं. तर लिव्हिंगस्टोनलाही ठाकूरनं ३६ धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर सॅम कुरननं संघाची धुरा सांभाळात सामन्यात पुनरागमन केलं होतं. अखेरीस भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यात मारा करत इंग्लंडला लगाम घातला. 

षटकारांची उधळण! भारत वि. इंग्लंड वनडे मालिकेत आजवरचे सर्वाधिक षटकार

पंत पुन्हा चमकला
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत भारतीय संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय संघाकडून रिषभ पंतनं सर्वाधिक ७८ धावांची खेळी साकारली. तर सलामीवीर शिखर धवन (६७) आणि हार्दिक पंड्या (६४) यांनी अर्धशतकं ठोकली. रिषभनं केवळ ६२ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या साथीनं ७८ धावांची खेळी साकारली. हार्दिक पंड्यानं चांगली साथ देत ४४ चेंडूत ६४ धावा कुटल्या.  

सामनावीर- सॅम कुरन (नाबाद ९५ धावा)
मालिकावीर- जॉनी बेअरस्टो (तीन सामन्यात एकूण २१९ धावा)

 

Web Title: india vs england team india won by 7 runs and takes series by 2 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.