Join us  

India vs England Test 2018: भारताच्या सरावावर 'पाणी'

इंग्लंडमधील वातावरण कधी कूस बदलते, याचा नेम नसतो. या गोष्टीचाच प्रत्यय सध्याच्या घडीला भारतीय संघालाही येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 3:20 PM

Open in App
ठळक मुद्देजेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या गोलंदाजीसाठी हे पोषक वातावरण असल्याचे म्हटले जात आहे.

लंडन : इसेक्सविरुद्धचा सराव सामना चारऐवजी तीन दिवसांचा करण्यात आला. भारताला पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव करायला जास्त वेळ मिळाला, असा संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा हेतू होता. मात्र सध्याच्या घडीला भारताच्या  सरावावर पाणी फेरले जात आहे.

इंग्लंडमधील वातावरण कधी कूस बदलते, याचा नेम नसतो. या गोष्टीचाच प्रत्यय सध्याच्या घडीला भारतीय संघालाही येत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सराव सामना बर्मिंगहम येथे होणार आहे. पण भारतीय संघाला पावसामुळे सराव करायला मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. कारण गेले काही दिवस बर्मिंगहममध्ये पाऊस पडत असल्यामुळे संघाच्या सरावावर पाणी फरले आहे.

इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी पोषक वातावरणबर्मिंगहममध्ये सध्याच्या घडीला पाऊस पडत असून हे वातावरण इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी पोषक असल्याचे म्हटले जात आहे. पावसामुळे खेळपट्टी स्विंग गोलंदाजांना अनुकूल असेल. त्यामुळे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या गोलंदाजीसाठी हे पोषक वातावरण असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट