ठळक मुद्देबीसीसीआयनेच आपल्या ट्विटर हँडलवर खेळपट्टीवरचे गवत कमी केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
लंडन : सराव सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरचे गवत अखेर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या त्राग्यानंतर कमी करण्यात आले आहे. बीसीसीआयनेच आपल्या ट्विटर हँडलवर खेळपट्टीवरचे गवत कमी केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
बीसीसीआयने पोस्ट केलेला खेळपट्टीचा व्हिडीओ
मंगळवारी सामन्याच्या पूर्वसंध्येला शास्त्री यांनी खेळपट्टीची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी खेळपट्टीवरील गवताबाबत आक्षेप घेतला होता. त्यांच्या या आक्षेपामुळे चार दिवसाचा सराव सामना तीन दिवसांचा करण्यात आला. इसेक्स क्लबच्या मैदानातील कर्मचाऱ्यांनी शास्त्री यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यानंतर खेळपट्टीवरील गवत कमी केले.
Web Title: India vs England Test: ... and after Ravi Shastri anger curator to reduce the grass on the pitch, see the video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.