ठळक मुद्देसोमवारी मात्र त्याने शतक झळकावले आणि आपल्या कारकिर्दीच्या चक्राला पूर्णविराम दिला.
लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर अॅलिस्टर कुकने अखेरच्या डावात शतक झळकावत तमाम क्रिकेट रसिकांची मने जिंकली. पण हा एक शतकांचा योगायोग ठरला आहे.
तब्बल 12 वर्षांपूर्वी कुकने भारताविरुद्ध नागपूर येथे कसोटी पदार्पण केले होते. या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात कुकने 60 धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या डावात मात्र त्याने शतक झळकावले होते.
आता अखेरचा सामनाही कुक भारताविरुद्ध खेळला. पहिल्या डावात त्याने अर्धशतक झळकावले. पण सोमवारी मात्र त्याने शतक झळकावले आणि आपल्या कारकिर्दीच्या चक्राला पूर्णविराम दिला. कुकने आठ चौकारांच्या जोरावर ही नाबाद शतकी खेळी साकारली आहे.