Join us  

India vs England Test: परत ये... परत ये... धोनी संघात परत ये; चाहते करतायत आता अशी मागणी

चार डावांमध्ये कार्तिकला फक्त 21 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याला संघातून वगळून रिषभ पंतला संघात स्थान देण्याबाबत विचार सुरु आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 4:52 PM

Open in App
ठळक मुद्देधोनीने 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

नवी दिल्ली : भारतालाइंग्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांनी महेंद्रसिंग धोनीला संघात घ्यावे, अशी मागणी करायला सुरुवात केली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये कार्तिकला चांगले यष्टीरक्षण करता आलेले नाही. त्याच्याकडून बऱ्याच चुका पाहायला मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर फलंदाजीमध्येही कार्तिकला छाप पाडता आलेली नाही. चार डावांमध्ये कार्तिकला फक्त 21 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याला संघातून वगळून रिषभ पंतला संघात स्थान देण्याबाबत विचार सुरु आहे. पण पंतला अजून कसोटी सामन्यांचा अनुभव नाही. त्याचबरोबर इंग्लंडसारख्या ठिकाणी पंतला संधी द्यायची का, हा विचारदेखील संघ व्यवस्थापन करत आहे.

 

धोनीने 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये धोनी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मागणीचा विचार निवड समिती करणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीदिनेश कार्तिकभारतइंग्लंड