Join us  

India vs England Test: जेव्हा इंग्लंडने अवघ्या दोन धावांनी मिळवला होता विजय... 

India vs England Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी बुधवारी सुरू होत आहे. भारतीय म्हणून आपण या कसोटीकडे मोठी आस लावून बसलो आहोत. पण त्याच वेळेला इंग्लंडच्या संघासाठी या कसोटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: July 31, 2018 10:05 AM

Open in App

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी बुधवारी सुरू होत आहे. भारतीय म्हणून आपण या कसोटीकडे मोठी आस लावून बसलो आहोत. पण त्याच वेळेला इंग्लंडच्या संघासाठी या कसोटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण एडबॅस्ट्न येथे ते कसोटी इतिहासातील १००० वा सामना खेळण्यासाठी उतरणार आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठणारा तो एकमेव संघ ठरणार आहे आणि भारताला पराभूत करून हा ऐतिहासिक क्षण सुवर्ण अक्षराने नोंदवण्यासाठी इंग्लिश खेळाडू प्रयत्नशील असणार आहेत. अशात भारतीयांसाठी ही कसोटी अपेक्षेपेक्षा अधिक आव्हानात्मक झाल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको. ही कसोटी खरच इंग्लंडच्या इतिहासात  सुवर्णाक्षरात नोंदवली जाते की विराट कोहलीची सेना चमत्कार करतात हे काळच सांगेल. पण तत्पूर्वी ९९९ कसोटीतील इंग्लंडच्या काही अविस्मरणीय विजयावर दृष्टीक्षेप टाकायला हवा. एडबॅस्टन येथे २००५ च्या ॲशेस कसोटीतील सामन्यात इंग्लंडने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला होता. विजयासाठी २८१ धावांचा पाठलाग करताना ब्रेट ली आणि मिचल कॅस्प्रोविच ही ऑस्ट्रेलियाची अखेरची जोडी खेळपट्टीवर होती. २७९ धावांपर्यंत ही जोडीने सामना खेचला, परंतु स्टीव हार्मिसनने कॅस्प्रोविचला झेलबाद केले आणि स्टेडियमवरील शुकशुकाटाचे रुपांतर जल्लोषात झाले. ॲशेस मालिकेतील सर्वात कमी धावांच्या फरकाने इंग्लंडने हा सामना जिंकला होता. 

या मॅचचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...https://www.ecb.co.uk/tv/247846

ॲशेस मालिकेतील या सामन्याची नोंद न करता पुढे जाणे म्हणजे चूकच. १९८२ च्या ओव्हल कसोटीत इंग्लंडला विजयासाठी केवळ ८५ धावांची आवश्यकता होती आणि २ बाद ५१ अशा सुस्थितीत यजमान होते. पण पुढील २६ धावांत जे घडले ते कुणालाही अपेक्षित नव्हते. इंग्लंडचा संपूर्ण संघ ७७ धावांत माघारी परतला. फ्रेडरिक स्पोफोर्थने ४४ धावांत ७ विकेट घेतल्या होत्या. स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांपैकी एकाला हृदय विकाराचा झटका आला तर एका महिलेने तिच्या हातातील छत्री तोडली होती. स्पोर्टिंग टाइम्स या वृत्तपत्राने त्यावेळी या सामन्याचे वर्णन 'अंत्यसंस्कार करून ऑस्ट्रेलिया राख घेऊन चालले.' असे केले होते. 

इयान बॉथम यांचे नाव महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये का घेतले जाते याचे उदाहरण देणारा हा प्रसंग. १९८१चा साल एडबॅस्टन कसोटीत इयान बॉथम यांनी करिष्मा केला. पराभवाचे ओझे घेऊन येथे दाखल झालेला इंग्लंडचा संघ पुन्हा पराभवाच्या छायेतच होता. विजयासाठी १५१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया ४ बाद १०५ अशा धावसंख्येसह विजयाकडे कूच करत होता. पण बॉथम यांनी टाकलेल्या त्या २८ चेंडूनी होत्याचे नव्हते केले. अवघी एक धाव देत बॉथम यांनी ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज माघारी धाडले आणि इंग्लंडने २९ धावांनी ही लढत जिंकली. पुढील कसोटीत बॉथम यांनी खणखणीत शतक ठोकले. 

काही महत्त्वाचे १९२० च्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील सुवर्णपदक जिंकणारे ग्रेट ब्रिटनचे जॉन ' जॅक' मॅक् ब्रायन यांची १९२४ मध्ये इंग्लंडच्या कसोटी सामन्यात निवड झाली. ओल्ड ट्रॅफर्डवरील दक्षिण आफ्रिकेविरूध्दची ती लढत केवळ एका दिवसाची झाली. पावसाने लढतीच्या अन्य दिवसांवर पाणी फेरले.त्यामुळे फलंदाज असलेल्या जॅक यांना ना फलंदाजी करण्याची संधी मिळाली ना गोलंदाजीची.

९९९ कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. त्याने एकूण ३०,३९८ चेंडू टाकलेत, तर स्टुअर्ट ब्रॉड २४,३४६ चेंडूसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा