लंडन : सध्याच्या घडीला सर्वात चर्चेचा विषय ठरतो तो भारताचा कर्णधार विराट कोहली. सध्या इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये कसोटी सामना होणार असला तरी त्यापेक्षा साऱ्यांना उत्सुकता आहे ती कोहलीच्या कामगिरीची. त्यामुळे इंग्लंडच्या एका माजी खेळाडूने त्यांच्या संघाला कोहलीला झटपट बाद करण्यासाठी काही सल्ले दिले आहेत.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंडच्या जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना कोहलीला बाद करण्यासाठी काही सल्ले दिले आहेत. या सल्ल्याचे इंग्लंडच्या या दोन्ही गोलंदाजांनी पालन करायचे ठरवले तर कोहली जास्त वेळ खेळपट्टीवर जास्त काळ राहू शकत नाही. कोहलीकडे फार कमी संयम आहे. हे पाहता वॉनने हे सल्ले दिले आहेत.
कोहलीला झटपट बाद करण्याबाबत वॉन म्हणाला की, " कोहलीला अजूनही ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूंचा समर्थपणे सामना करता आलेला नाही. त्यामुळे कोहली जेव्हा फलंदाजीला येईल, तेव्हा तुम्ही ऑफ स्टम्पच्या बाहेर सातत्याने मारा करत राहीलात तर कोहली नक्कीच लवकर बाद होऊ शकतो. सध्याच्या घडीला खेळपट्टीवर चेंडू चांगलेच स्विंग होतील आणि त्यामुळे कोहलीची डोकेदुखी आणखीन वाढणार आहे. "