मुंबई - भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. लॉर्ड्स कसोटीत भारताला एक डाव आणि 159 धावांनी हार मानावी लागली. लॉर्ड्सवर डावाने पराभूत होण्याची भारताची ही तिसरी वेळ. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर पुन्हा भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या वेगाने भारतीय संघाला मेटाकुटीला आणले.
( कोहली, शास्त्रीचे अधिकार कमी होणार?)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाठीचे दुखणे घेऊन मैदानावर उतरला. त्याच्यासह अन्य फलंदाज दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरले आणि भारताला डावाने हार मानावी लागली. शनिवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत त्यांच्याकडून पुनरागमनाची अपेक्षा आहे. कोहलीलाही लॉर्ड्सवरील पराभवाचा पश्चाताप होत आहे आणि त्याने सोशल मीडियावर भावनिक मॅसेज पोस्ट केला आहे.
'काही वेळा आम्ही जिंकतो आणि काहीवेळा शिकतो. तुम्ही आमच्यावरील विश्वास कायम ठेवा आणि त्याला तडा जाऊ देणार नाही, असे वचन देतो," असे कोहलीने त्याच्या फेसबुक पेजवर लिहिले आहे.