लॉर्ड्स - भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीत यजमान इंग्लंडकडून एक डाव व 159 धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवाबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 0-2 अशा बॅकफुटवर गेला आहे आणि येथून कमबॅक करणे भारतासाठी अशक्यप्राय आहे.
( India vs England Test: म्हणून आम्ही हरलो, विराट कोहलीचा मोठा खुलासा)
त्यात भारतीय चमूत कर्णधार विराट कोहलीच्या तंदुरूस्तीवरून चिंतेचे वातावरण आहे. दुस-या कसोटीच्या तिस-या दिवसाच्या खेळात विराट बराच काळ सीमारेषे बाहेरच बसलेला होता, तर दुस-या डावात फलंदाजीसाठीही तो खालच्या क्रमांकावर आला. त्यामुळे तिस-या कसोटीतील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
( India vs England Test: Ohhh... विराट कोहली तिस-या कसोटीला मुकणार? )
पाठीच्या दुखण्यामुळे विराटला फलंदाजी करतानाही त्रास होत होता. मात्र, सामन्यानंतर त्याने पाच दिवसांत तंदुरूस्त होणार असल्याचे सांगितले. 18 ऑगस्टपासून नॉटिंगहम कसोटीला सुरूवात होणार आहे आणि या लढतीत पूर्णपणे तंदुरूस्त होणार असल्याचा विश्वास विराटने व्यक्त केला. कोहलीने दुस-या डावात 29 चेंडूंत 17 धावा केल्या. स्टुअर्ट ब्रॉडने त्याला बाद केले.
कोहली म्हणाला, पाठीच्या खालच्या बाजूला वेदना होत आहेत. जुन्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढल आहे. कामाचा अधिक ताण आणि सततचे सामने यामुळे हा त्रास झालेला आहे. तिस-या कसोटीला पाच दिवस आहेत आणि या पाच दिवसांत मी पूर्णपणे तंदुरूस्त होइन. कोहली काय म्हणाला पाहा..
( blob:http://www.bcci.tv/31d6f217-7514-4908-bd4d-bb93954c2bdc )