लंडन : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारताला तीन धक्के बसलेले आहेत. पण आता त्यांना चौथा धक्काही बसू शकतो, असे वाटत आहे. कारण भारताच्या एका माजी गोलंदाजाने संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शमीला यापूर्वी गुडघ्याची दुखापत झाली होती. या दुखापतीतून शमी अजून सावरलेला दिसत नसल्याचे म्हटले जात आहे. भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहराने शमीच्या फिटनेसवर भाष्य केले आहे.
शमीच्या फिटनेसबद्दल नेहरा म्हणाला की, " गेल्या सहा महिन्यांमध्ये मोहम्मद शमीच्या कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. त्याच्या गुडघ्याला झालेली दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली दिसत नाही. त्यामुळे शमीला अन्य गोलंदाजांसारखे मोठे स्पेल टाकता येणार नाही. त्यामुळे कर्णधार कोहलीने त्याच्या गोलंदाजीचा वापर करताना विचार करायला हवा. "