India Vs England Test : रवी शास्त्री यांनी इंग्लंडला सांगितला हा नवा फॉर्म्युला

मंगळवारी शास्त्री यांनी इसेक्सच्या मैदानातील खेळपट्टीवर नाराजी दर्शवली होती. खेळपट्टीवरील गवत त्यांनी कापायला सांगितले, असे तेथील मैदानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 08:54 PM2018-07-25T20:54:11+5:302018-07-25T20:55:00+5:30

whatsapp join usJoin us
India Vs England Test: The new formula told by Ravi Shastri to England | India Vs England Test : रवी शास्त्री यांनी इंग्लंडला सांगितला हा नवा फॉर्म्युला

India Vs England Test : रवी शास्त्री यांनी इंग्लंडला सांगितला हा नवा फॉर्म्युला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमी खेळपट्टीवरील गवत कापायला सांगितलेच नव्हते, असा खुलासा आता शास्त्री यांनी केला आहे.

लंडन : बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. रवी शास्त्री हे भारताचे मुख्य प्रशिक्षक आहे, तर मग ते इंग्लंडच्या संघाला नवा फॉर्म्युला का सांगत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण त्यांनी हा नवा फॉर्म्युला सांगताना आपला राग व्यक्त केला आहे.

मंगळवारी शास्त्री यांनी इसेक्सच्या मैदानातील खेळपट्टीवर नाराजी दर्शवली होती. खेळपट्टीवरील गवत त्यांनी कापायला सांगितले, असे तेथील मैदानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आणि त्यामुळे चार दिवसांचा सामना तीन दिवसांमध्ये आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मी खेळपट्टीवरील गवत कापायला सांगितलेच नव्हते, असा खुलासा आता शास्त्री यांनी केला आहे.

शास्त्री याबाबत म्हणाले की, " आम्ही इंग्लंडमध्ये खेळताना कोणतीही सबब देणार नाही. खेळपट्टीवरील गवत कापायला मी सांगितले नव्हते. इंग्लंडमध्ये खेळताना मी कोणतेही प्रश्न विचारणार नाही. " हे सांगितल्यावर शास्त्री यांनी नवा फॉर्म्युला इंग्लंडला सांगितला आहे. ते म्हणाले की, "  आम्ही इंग्लंडमध्ये खेळपट्टीवरबद्दल काही बोलणार नाही आणि तुम्हीदेखील भारतात आला की कुठलेही प्रश्न विचारायचे नाही. "

Web Title: India Vs England Test: The new formula told by Ravi Shastri to England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.