Join us  

India Vs England Test : भारताने इंग्लंडमध्ये 85 वर्षांत जिंकल्या फक्त तीन कसोटी मालिका

भारताने 1932 साली इंग्लंडचा पहिला दौरा केला होता. पण भारताला इंग्लंडमध्ये 1971 साली पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकता आली होती. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने 1971 साली 1-0 अशी कसोटी मालिका जिंकली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 5:06 PM

Open in App
ठळक मुद्दे2007मध्ये इंग्लंडमध्ये भारताने कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर गेल्या अकरा वर्षांत भारताला इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिक जिंकता आलेली नाही.

नवी दिल्ली : भारतासाठी इंग्लंडचा दौरा नेहमीच खडतर राहीलेला आहे. कारण यापूर्वी भारताने इंग्लंडमध्ये 17 कसोटी मालिक खेळल्या आहेत. पण या 17 पैकी भारताला फक्त तीन मालिकाच जिंकत्या आल्या आहेत. या 17 पैकी 13 मालिका जिंकत इंग्लंडने मायदेशात नेहमीच वरचष्मा गाजवला आहे.

भारताने 1932 साली इंग्लंडचा पहिला दौरा केला होता. पण भारताला इंग्लंडमध्ये 1971 साली पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकता आली होती. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने 1971 साली 1-0 अशी कसोटी मालिका जिंकली होती. ही कसोटी मालिका तीन सामन्यांची होती. या मालिकेत दोन सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना भारताने जिंकला होता.

भारताने इंग्लंडमध्ये दुसरा मालिका विजय मिळवला होता तो 1986 साली. या संघात सुनील गावस्कर, कपिल देव या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. या दौऱ्यातील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते आणि एक सामना अनिर्णित राहिला होता. भारताने इंग्लंडमध्ये तिसरा आणि अखेरचा मालिका विजय मिळवला तो 2007 साली. यावेळी भारताने कसोटी मालिकेत 1-0 असा विजय मिळवला होता. 2007मध्ये इंग्लंडमध्ये भारताने कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर गेल्या अकरा वर्षांत भारताला इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिक जिंकता आलेली नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतक्रिकेट