ओव्हल, भारत वि. इंग्लंडः लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी लढाऊ बाणा दाखवत इंग्लंडला विजयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना भारतीय चाहत्यांकडूनही दाद मिळाली. पण, दुर्दैवाने भारताला सामना अनिर्णीत राखता आला नाही. इंग्लंडने 118 धावांनी हा सामना जिंकला आणि मालिका 4-1 अशी खिशात घातली. चौथ्या डावात पंतने कसोटीतील पहिले शतक झळकावताना अनेक विक्रम केले. इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा पहिला यष्टिरक्षक ठरला. पंतने कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून धावांचे खाते उघडले होते. मंगळवारी पंतने तसाच षटकार खेचून शतक पूर्ण केले. त्याच्या या षटकाराने भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली. शतकासमीप आल्यावरही नेहमीच्या आक्रमक शैलीतच फटकेबाजी करणारा सेहवाग सर्वांना आठवला.
(रिषभ पंतची Classic फटकेबाजी)
पंतच्या विक्रमी खेळीचे अनेक दिग्गजांनी तोंडभरून कौतुक केले.