Join us  

रोहितचे ग्रहमान फिरले! गेल्या ४७७ दिवसांपासून एकही शतक नाही, स्थान गमावणार?

India vs England Test Match 1, Day 4: रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑक्ट्रोबर २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांची कसोटीत २१२ धावांची खेळी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 6:41 PM

Open in App

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. रोहित दुसऱ्या डावात अवघ्या १२ धावांवर बाद झाला. रोहितनं सुरुवात चांगली केली होती. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्यानं खणखणीत षटकार देखील ठोकला होता. पण इंग्लंडचा डावखुरा फिरकीपटू जॅक लीचनं रोहितला क्लीनबोल्ड केलं. पहिल्या डावातही रोहित अवघ्या ६ धावांवर माघारी परतला होता. (India vs England Test Match 1, Day 4 : Rohit Got Out)

रोहित शर्माला गेल्या ८ कसोटी सामन्यांमध्ये एकही शतक ठोकता आलेलं नाही. रोहितची कसोटीतील खराब कामगिरी आता भारतीय संघासाठी चिंतेची बाब होऊ लागली आहे. रोहितनं याआधी ऑक्टोबर २०१९ मध्ये रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१२ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर आतापर्यंत रोहितला एकही शतक साकारता आलेलं नाही. 

टार्गेट ३८१ शक्य; वीरूची मॅजिकल खेळी अन् सचिन तेंडुलकरचं नाबाद शतक, टीम इंडियाला हवाय असा करिष्मा

कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या ८ इनिंग्जमध्ये रोहितचा स्कोअर अनुक्रमे ६, २१, २६, ५२, ४४, ७, ६ आणि १२ असा राहिला आहे. यात रोहितने दोन वेळा बांगलादेश, दोन वेळा ऑस्ट्रेलिया आणि एकदा इंग्लंडविरुद्ध फलंदाजी केली आहे. सिडनी कसोटीत रोहितनं अर्धशतक ठोकलं होतं. गेल्या ४७७ दिवसांमध्ये रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक साकारता आलेलं नाही. 

७ फूट उंचीचा धिप्पाड गोलंदाज, एकही धाव नाही, ना विकेट घेतली ना झेल टीपला; तरीही झाला सामानावीर!

२०१३ साली पदार्पण आणि केवळ ६ कसोटी शतकंरोहित शर्माने २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या कसोटी संघात पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये रोहितने शतकं ठोकली होती. तरीही रोहितला कसोटी संघातील स्थान पक्कं करता आलं नाही. २०१३ साली पदार्पण केल्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर रोहितनं श्रीलंका विरुद्ध कसोटी शतक ठोकलं. त्यानंतरचं रोहितचं शकत पाहण्यासाठी दोन वर्षांची वाट पाहावी लागली. २०१३ सालापासून आतापर्यंत केवळ ६ कसोटी शतकं रोहितला करता आली आहेत. 

रिषभ पंतनं पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; इंग्लंडच्या कर्णधारावर केली मात

कामगिरीत सातत्य नसल्याच्या टीकेमुळे रोहितला आजवर अनेकदा कसोटी संघातील स्थान गमवावं लागलं आहे. भारताबाहेर खेळविलेल्या गेलेल्या कसोटी मालिकांमध्ये रोहितची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. परदेशात रोहितला अद्याप एकही कसोटी शतक ठोकता आलेलं नाही. परदेशात रोहितची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ७५ अशी आहे. तीही त्यानं २०१५ साली श्रीलंकेविरुद्ध साकारली होती. रोहितनं आतापर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या जवळपास सर्वच कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा दौरा केला आहे. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितचा धमाकाकसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी राहिलेल्या रोहितची बॅट एकदिवसीय क्रिकेटमध्ये आजवर जोरदार तळपली आहे.  एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितनं आतापर्यंत २९ शतकं ठोकली असून ९ हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित भारतीय संघाचा उपकर्णधार देखील आहे.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ