इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं लागल्यानंतर आता कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) प्रचंड दबाव वाढला आहे. कसोटी मालिकेत १-० ने मागे असल्यानं चेन्नईच्या स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीचं महत्व आता वाढलं आहे. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभवाची धूळ चारली होती. पण आता इंग्लंडचा सध्याचा फॉर्म पाहता भारताची देखील ऑस्ट्रेलियासारखी गत होते की काय? अशी शक्यता दिग्गजांकडून व्यक्त केली जात आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका वाचवायची असेल तर भारतीय कसोटी संघात फिरकीपटू यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला संधी देण्यात यावी असा सल्ला दिला आहे. (India vs England Test Aakash Chopra Suggestion to give chance yuzvendra chahal)
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला 'तेंडुलकर-कूक ट्रॉफी' असं नाव द्या; BCCI-ECB कडे होतेय मागणी
पहिला कसोटीतील संघ निवडीत कोणतीही चूक नव्हती, पण आता पुन्हा एकदा याबाबत विचार केला जाईल, असं विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतीय संघात बदल केले जाण्याचे संकेत आहेत. यात नेमकं कोणकोणत्या खेळाडूंना संघाच्या बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
आकाश चोप्राचा नेमका सल्ला काय?भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल याला भारतीय कसोटी संघात संधी दिली जावी असं आकाश चोप्रा याचं म्हणणं आहे. त्यासंदर्भातील ट्विट आकाश यानं केलं आहे. "भारतीय संघाला आता यजुवेंद्र चहल याच्या कसोटी पदार्पणासाठी प्रयत्न करायला हवेत असा माझा थोडासा हटके विचार आणि सल्ला आहे. कारण बायो-बबलच्या प्रोटोकॉलमुळे त्याला संघाशी जुळवून घेण्यात थोडा वेळ जाईल. अशात त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत", असं आकाश चोप्रानं म्हटलं आहे. क्रिकेट चाहत्यांनीही आकाश चोप्राच्या सल्ल्याला पाठिंबा दिला आहे.
यजुवेंद्रनं २०१८ नंतर एकही कसोटी खेळली नाहीयजुवेंद्र चहलनं आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३१ सामने खेळले आहेत. यात त्यानं एकूण ८४ विकेट घेतल्या आहेत. यात दोनवेळा त्यानं एका डावात पाचपेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. २०१८ नंतर त्यानं एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याचं पदार्पण होऊ शकलेलं नाही.