Join us

India vs England Test: भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी स्टोक्सला वगळले, वोक्सला संधी

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघातून अष्टपैलू बेन स्टोक्सला वगळण्यात आले आहे, त्याच्या जागी ख्रिस वोक्सला संघात स्थान देण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 19:37 IST

Open in App
ठळक मुद्देगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ब्रिस्टल येथे एका नाईटक्लब बाहेर स्टोक्सशी एका व्यक्तीबरोबर मारामारी झाली होती. हे प्रकरण न्यायालयात आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे.

लंडन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघातून अष्टपैलू बेन स्टोक्सला वगळण्यात आले आहे, त्याच्या जागी ख्रिस वोक्सला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर डेव्हिड मलानलाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवला असून त्याच्या जागी ऑली पोप या युवा खेळाडूला संधी दिली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ब्रिस्टल येथे एका नाईटक्लब बाहेर स्टोक्सशी एका व्यक्तीबरोबर मारामारी झाली होती. हे प्रकरण न्यायालयात आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. जर स्टोक्स या प्रकरणात दोषी आढळला तर त्याला दुसऱ्या सामन्यात खेळता येणार नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या संघातून वगळण्यात आले आहे.

टॅग्स :बेन स्टोक्सभारत विरुद्ध इंग्लंड