ओव्हल, भारत वि. इंग्लंडः चौथ्या कसोटीतील पराभवानंतरही प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाची पाठराखण केली होती. मागील 10-15 वर्षांतील हा भारताचा सर्वोत्तम संघ असल्याच्या दावा शास्त्री गुरुजींनी केला होता. त्यांची सोशल मीडियावर आणि माजी खेळाडूंकडून खिल्ली उडवण्यात आली. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीला भारतीय संघाच्या कामगिरीबद्दलच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. त्याचे उत्तर देताना कोहली आनंदी दिसत नव्हता.
(India vs England Test: भारतीय संघ म्हणजे बडा घर पोकळ वासा... )
मागील 15 वर्षांतील भारताचा हा सर्वोत्तम संघ असल्याच्या शास्त्री यांच्या दाव्याचे संघाने दडपण घेतले होते का? तुला खरचं त्या दाव्यात तथ्य वाटते का? असे प्रश्न एका पत्रकाराने कोहलीला विचारले. त्यावर कोहलीने आपला राग आवरत अगदी शांतपणे उत्तर दिले. तो म्हणाला,''आमचा संघ सर्वोत्तम आहे, असा आमचा विश्वास आहे. तो आम्ही ठेवू नये का?'' कोहलीने पत्रकारांकडून आलेला पहिला बाऊंसर अगदी चपळाईने सोडला.
(अॅलिस्टर कुकला इंग्लंडचा विजयी निरोप, टीम इंडियाचा 118 धावांनी पराभव)
पण, प्रश्नांचा भडीमार सुरूच राहिला आणि कोहलीचा पारा चढला. खरच हा सर्वोत्तम संघ आहे का, पुन्हा आलेल्या प्रश्नावर ''तुम्हाला काय वाटते,'' असा प्रतीप्रश्न करून कोहलीने उत्तर देणे टाळले. मात्र, चेहऱ्यावर आलेला राग तो लपवू शकला नाही. पाहा हा व्हिडिओ...