जळगाव - २०१४ चा निराशाजनक दौरा विसरुन विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत कोण कोणावर वर्चस्व गाजवतो, याकडे एक सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांची विराट कोहली,अजिंक्य रहाणे आणि कंपनी कशी धुलाई करतात. तर भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमराच्या अनुपस्थितीत इशांत शर्मा इंग्लिश फलंदाजांना कसे नमोहराम करतो, याचा घेतलेला आढावा
जेम्स अँडरसन विरुद्ध विराट कोहलीटीम इंडियाचा कर्णधार असलेला विराट कोहली सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. ९०० च्या वर रेटिंग असलेल्या कोहलीला अव्वल स्थानावर पोहचण्यासाठी इंग्लंड दौरा मदत करू शकतो. मात्र त्याच्या या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे तो इंग्लंडचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज जेम्स अँडरसन. २०१४ च्या टीम इंडियाच्या इंग्लंड दौ-यात कोहलीला सर्वात जास्त त्रस्त अँडरसन यानेच केले होते. त्याने १० डावात त्याला तब्बल चार वेळा बाद केले होते. अँडरसन आणि ब्रॉड यांच्या भेदक गोलंदाजीसमोर विराटसाठी हा दौरा वाईट ठरला होता.
चेतेश्वर पुजारा विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडभारताचा कसोटीतील भरवशाचा फलंदाज म्हणजे चेतेश्वर पुजरा. चिवट आणि संयमी खेळीसाठी पुजारा ओळखला जातो. मात्र इंग्लंडच्या भूमीवर त्याला फारसे यश मिळाले नाही. मात्र भारतीय उपखंडातील अपयश आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौºयातील निराशेनंतर त्याच्यासाठी ही अखेरची संधी असू शकते. त्याचा चिवट खेळ हीच त्याची ओळख आहे. मात्र त्याच्यासाठी या दौ-यात मोठा अडथळा ठरू शकतो तो स्टुअर्ट ब्रॉड. अँडरसननंतर वेगवान गोलंदाजीतील इंग्लंडचे सर्वात मोठे अस्त्र आहे. २०१४ च्या मालिकेत ब्रॉडने पुजाराला चांगलेच त्रस्त केले होते.
अजिंक्य रहाणे वि. आदिल राशिद२०१४ च्या दौºयात भारताकडून दुस-या कसोटी सामन्यात शतक झळकावणा-या अजिंक्य रहाणे याच्यासाठी परदेश दौरे नेहमीच फायदेशीर राहिले आहेत. २०१४ च्या दौ-यात अजिंक्यने एकूण २९९ धावा केल्या होत्या. मात्र इंग्लंडच्या २०१६ च्या भारत दौ-यात त्याला आदिल राशिदने त्रस्त केले होते आणि एकदा बादही केले होते. अजिंक्य रहाणेच्या खेळातील कमकुवत बाब म्हणजे तो धिम्या गतीने चेंडू टाकणा-या गोलंदाजांविरोधात फारसा चांगला खेळत नाही.
अॅलेस्टर कुक विरुद्ध इशांत शर्मा२०१४ चा इंग्लंड दौरा इशांत शर्मासाठी लाभदायी ठरला होता. त्याने दुस-या सामन्यात एकाच डावात सात गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने इंग्लंडचा त्या वेळचा कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज अलेस्टर कुकला एक वेळा बाददेखील केले होते. त्याने या दौ-यात एकूण १४ गडी बाद केले होते. इशांत भारताचा तर कुक इंग्लंडचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. भुवनेश्वर आणि बुमराह यांच्या अनुपस्थितीत तो संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतो.
जो रुट विरुद्ध आर. अश्विनमर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडला विजय मिळवून देण्यात जो रुट याने सर्वात मोठी भूमिका बजावली. मात्र रुटला बाद करण्याचे कौशल्य आर. अश्विनमध्ये आहे. २०१६ च्या भारत दौ-यात इंग्लंडच्या या कर्णधाराला अश्विनने दोन वेळा बाद केले.