Join us  

India vs England : विराट कोहली 2017 व 2018 सालचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू!

कर्णधार विराट कोहलीला इंग्लंडच्या बार्मी आर्मीकडून 2017 व 2018 चा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 10:55 AM

Open in App

लंडन - कर्णधार विराट कोहलीने सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करून भारतीय संघाला सावरले. एसेक्सविरूद्धच्या सराव सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहलीला इंग्लंडच्या बार्मी आर्मीकडून 2017 व 2018 चा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. कोहलीने 68 धावांची खेळ केली. भारताने पहिल्या दिवशी सहा बाद ३२२ धावा केल्या. दिनेश कार्तिक ८१ तर हार्दिक पंड्या २२ धावांवर खेळत आहेत.

(सराव सामना : कार्तिक -विराटने सावरला भारताचा डाव)भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. तत्पूर्वी भारतीय संघ एसेक्सविरूद्ध तीन सामन्यांचा सराव सामना खेळत आहे. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर कोहली, मुरली विजय आणि कार्तिक यांनी संयमी खेळी केली. सामन्यानंतर बार्मी आर्मीने कोहलीला पदक देऊन गौरवले. बीसीसीआयने तो क्षण ट्विट केला आहे.  "बार्मी आर्मीने केलेल्या गौरवाबद्दल त्यांचे आभार. अन्य देशांतील क्रिकेट प्रेमींकडून मिळणा-या प्रेमाने मला नेहमी आनंद होतो,'' अशी प्रतिक्रीया कोहलीने दिली.

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयक्रीडा