India vs England, T20: भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धचा पहिल्या टी-२० सामन्यात लाजीरवाण्या पराभवाला समोरं जावं लागलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला टी-२० सामना खेळविण्यात आला होता. भारतीय संघाच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनं खेळपट्टीवर खापर फोडलं आहे. (Ind vs Eng: Virat Kohli Reaction On Narendra Modi Stadium Pitch)
"खेळपट्टीमुळे आम्हाला नीट खेळता आलं नाही. या खेळपट्टीवर काय करायचं हेच आम्हाला कळालं नाही. याबाबत काहीच कल्पना नव्हती. पण आम्ही आमची चूक मान्य करतो. संघातील प्रत्येकाला त्याची चूक कळाली आहे आणि पुढच्या सामन्यात आम्ही याची नक्की काळजी घेऊ", असं विराट कोहली म्हणाला.
VIDEO: केएल राहुलचा 'सुपरमॅन' अंदाज पाहून प्रतिस्पर्धी संघ हैराण, एकदा पाहाच
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्येभारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळविण्यात आलेला पहिला टी-२० सामन्यासाठी ज्या खेळपट्टीचा वापर करण्यात आला होता तिचा रंग काळा होता. म्हणजेच खेळपट्टी काळ्या मातीनं तयार करण्यात आली होती. कसोटी सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीपेक्षा खूप वेगळी खेळपट्टी तयार करण्यात आली होती. कसोटी सामन्यावेळी लाल मातीच्या खेळपट्टीचा वापर करण्यात आला होता.
फलंदाजी वाईट झाल्याचं केलं मान्य"आमची फलंदाजी अतिशय वाईट झाली. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल. खेळपट्टी जाणून घेण्यासाठी आम्ही वेळ दिला नाही. मात्र श्रेयस अय्यरने तो प्रयत्न केला. पण त्यानंतरही आम्ही १५० धावा करू शकलो नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे चढ उतार येत असतात. जेव्हा आपलं नशीब जोरावर असतं त्यादिवशी आपण मोठी धावसंख्या उभारतो. पण प्रत्येक वेळी असं होत नाही", असं विराट कोहली म्हणाला.
जॉनी बेअरस्टो-वॉशिंग्टन सुंदर भिडले, मैदानावरील पंच भांडण सोडवायला धावले...
भारताचा ८ विकेट्सने पराभवइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा ८ विकेट्स दारुण पराभव झाला. इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २० षटकांच्या अखेरीस ८ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त १२४ धावा करता आल्या होत्या. भारतीय संघाचे पहिले चार फलंदाज संघाच्या अवघ्या ५० धावांच्या आतच माघारी परतले होते. इंग्लंडनं भारताचं १२५ धावांचं कमकुवत आव्हान अवघ्या २ विकेट्स गमावून गाठलं.