लीड्स : येथे सुरु असलेल्या निर्णायक वन-डे सामन्यात विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. कर्णधार म्हणून सर्वात जलद तीन हजार धावा करण्याचा पराक्रम विराट कोहलीने केला आहे. विराट कोहलीने 49 व्या डावांमध्ये हा कारनामा केला आहे. कर्णधार म्हणून फलंदाजी करताना विराट कोहलीने 83 च्या सरासरीने तीन हजार धावा पुर्ण केल्या आहेत.
कोहलीने सर्वात कमी डावांमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलर्सला विराटने मागे टाकले आहे. डिव्हिलर्स कर्णधार म्हणून खेळताना तीन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 60 डाव लागले होते. कोहलीने मात्र 49 डावात तीन हजार धावा पूर्ण केल्या
विराट कोहलीने भारताचे माजी कर्णधार एम.एस धोनी, सौरव गांगुली यांना मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनीला कर्णधार म्हणून तीन हजार धावा पुर्ण करण्यासाठी 70 डाव लागले होते. सौरव गांगुलीने 74 डावांत फलंदाजी करताना 3000 धावा पूर्ण केल्या होत्या.
वन-डेमध्ये 202 डावांत फलंदाजी करताना 92.08 च्या स्ट्राईक रेट आणि 58.13 च्या जबरदस्त सरासरीने विराट कोहलीने 9708 धावा केल्या आहेत.