लंडन : जो व्यक्ती आपल्या चुकांमधून शिकतो तो मोठा होतो, असे म्हणतात. पण भारताचा कर्णधार विराट कोहली गेल्या चार वर्षांमध्ये काहीच शिकला नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण ज्यापद्धतीने कोहली इंग्लंडच्या गेल्या दौऱ्यात बाद झाला होता, अगदी तसाच तो सराव सामन्यातही बाद झाला आहे.
इसेक्सविरुद्धच्या सराव सामन्यात कोहलीने 68 धावांची खेळी साकारी. कोहली आता इंग्लंड दौऱ्यातील पहिले शतक लगावेल, असे वाटलेही होते. पण चार वर्षांपूर्वी केलेली चूक पुन्हा केल्याने कोहलीचा घात झाला. इंग्लंडच्या पॉल वॉल्टरने 45 व्या षटकामध्ये उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकला. कोहली हा सामना खेळायला गेला आणि पहिल्या स्लीपमध्ये झेल देऊन तो तंबूत परतला.
विराटच्या फलंदाजीतील कच्चेदुवे वाचा...
India vs England : नजर हटी, दुर्घटना घटी... विराट कोहली धोकादायक 'वळणा'वर
http://www.lokmat.com/cricket/india-vs-england-challenges-virat-kohli-test-series-against-england/