ठळक मुद्देसुट्टी संपवून विराट कोहली पुन्हा टीम इंडियाचे नेतृत्व करणारइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोठा विक्रम नोंदवण्याची संधीअजिंक्य रहाणेही धोनीसह पॉली उम्रीगर यांचा विक्रम मोडण्याच्या तयारीत
विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून रजेवर गेलेला विराट इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे. अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला आणि आता विराटच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि मालिकेत विराटला MS Dhoni ( महेंद्रसिंग धोनी) याचे दोन मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे. या मालिकेसाठी विराट कसून मेहनत घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ICCनं पाकिस्तानी फलंदाज हसन अलीला केलं ट्रोल; सोशल मीडियावर केली पोलखोल!
इंग्लंडचा संघही श्रीलंका दौऱ्यावर २-० असा दणदणीत विजय मिळवून भारतात दाखल झाला आहे. कर्णधार जो रुट भलत्याच फॉर्मात आहे. त्यानं लंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. या मालिकेत विराटकडे कॅप्टन कूल धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून धोनीनं घरच्या मैदानावर सलग ९ कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि विराटनंही घरच्या मैदानावर सलग ९ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंडला नमवून विराट सलग १० कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करू शकतो. त्याशिवाय धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं घरच्या मैदानावर २१ कसोटी सामने जिंकले आहेत. विराटच्या नेतृत्वाखाली २० कसोटी सामने जिंकले आहेत आणि चेन्नई कसोटी जिंकून विराटला धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. India vs England : भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह, BCCIकडून खेळाडूंना गिफ्ट!
३२ वर्षीय
अजिंक्य रहाणेलाही ( Ajinkya Rahane) धोनीचा कसोटी धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. अजिंक्यनं ६९ कसोटी सामन्यांत ४२.५८च्या सरासरीनं ४४७१ धावा केल्या आहेत. त्यात १२ शतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत अजिंक्यनं ४०६ धावा केल्यास तो धोनीला मागे टाकू शकतो. धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकांचा समावेश आहे. अजिंक्यनं ८ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत १२ शतकं झळकावली आहे. त्यानं इंग्लंडविरुद्ध एक शतक झळकावल्यास तो पॉली उम्रीगर आणि मुरली विजय यांचा विक्रम मोडेल. या दोघांनी प्रत्येकी १२-१२ कसोटी शतकं झळकावली आहेत.
Web Title: India vs England: Virat Kohli sweats it out inside hotel room, chance to break MS Dhoni big Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.