इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं पहिल्या कसोटीत कौतुकास्पद कामगिरी केली. भारताला चेन्नईत खेळवलेल्या पहिल्या कसोटीत २२७ धावांनी पराभव पत्करावा लागला. जो रूटचा हा शंभरावा कसोटी सामना होता आणि १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभा केला. याउलट टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) अपयशी ठरला. त्यामुळे अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) कर्णधार बनवा अशी मागणी होऊ लागली आहे. पण, भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहरा ( Ashish Nerha) यानं विराट कोहलीच्या बचावासाठी बॅटिंग केली. पराभवानंतर विराट कोहलीनं 'चेंडू'बाबत व्यक्त केली नाराजी; याच चेंडूनं इंग्लंडनं उडवली टीम इंडियाची झोप
''तुम्ही एक किंवा दोन शतकाबद्दल चर्चा करता. भारतानं नाणेफेक जिंकली असती आणि प्रथम फलंदाजी केली असती तर त्यानंही २५० धावा चोपल्या असत्या. विराट कोहलीची हिच खासियत आहे. आर अश्विनची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाचा पराभव अटळ आहे, हे त्यालाही माहित होतं, परंतु त्यानं तरीही आक्रसताळेपणानं खेळ केला नाही. बेन स्टोक्सनं टाकलेल्या त्या चेंडूवर कुणीही बाद झालं असतं, तो खूप खाली होता,"असे नेहरानं स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात सांगितले. विराट कोहलीची चूक महागात पडणार; २-१ असा विजय मिळवल्यानंतरही टीम इंडियाची WTCची फायनल हुकणार?
दरम्यान, पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कोहली ( Virat Kohli) म्हणाला की, ''आम्ही इंग्लंडच्या फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यात अपयशी ठरलो. ''सामन्याच्या पहिल्या टप्प्यात आम्ही इंग्लंडच्या फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यात अपयशी ठरलो. जलदगती गोलंदाज, आर अश्विन आणि गोलंदाजी विभागानं पहिल्या डावात चांगली कामगिरी केली, परंतु त्यांच्या धावा रोखून त्यांच्यावर दडपण निर्माण करू शकलो असतो. ही संथ खेळपट्टी होती आणि गोलंदाजांना मदत मिळत नव्हती. त्यामुळे फलंदाज स्ट्राईक सतत बदलत होते आणि सामन्यावर पकड घेत होते.'' टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं अवघड?; जाणून घ्या समीकरणआघाडीच्या फलंदाजांचे कान टोचले... विराट कोहलीची चूक महागात पडणार; २-१ असा विजय मिळवल्यानंतरही टीम इंडियाची WTCची फायनल हुकणार?
पहिल्या डावाच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही चांगली कामगिरी केली, परंतु आघाडीच्या चार फलंदाजांनी निराश केले. याचा विचार करायला हवा आणि सुधारणा करायला हवी. इंग्लंडच्या फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली, असेही विराट म्हणाला. इंग्लंड-भारत यांच्यातला दुसरा सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईतच होणार आहे.