India vs England Warm-up match - आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीची झलक दाखवली. तरीही वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीपूर्वी भारताला दोन सराव सामने खेळायचे आहेत आणि त्यातला एक सामना आज गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध होणार आहे. पण, पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला आणि अखेर ३:४० वाजता सामना रद्द झाल्याचे वृत्त समोर आले आणि ६ वाजता बीसीसीआयने ही घोषणा केली. भारताला दरलँड्सविरुद्ध दुसरा सराव सामना २ ऑक्टोबरला तिरुअनंतपूरम येथे होणार आहे. काल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.
भारताने वर्ल्ड कप संघात अखेरच्या क्षणाला एक बदल केला. अक्षर पटेल दुखापतीतून न सावरल्याने आर अश्विनची संघात एन्ट्री झाली. आशिया चषक स्पर्धेत अश्विन संघाचा सदस्यही नव्हता आणि अचानक त्याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत दोन सामन्यात अश्विनने चांगली कामगिरी केली आहे. क्रिकएन्फोने दिलेल्या अपडेट्सनुसार सायंकाळी ७.३० ही कट ऑफ वेळ आहे आणि त्यानंतर षटकं कमी होतील. पावसाचा जोर कायम राहिल्याने दोन्ही संघ हॉटेलमध्ये परतले अन् मॅच रद्द करावी लागली.
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने -भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू