Join us  

India vs England: राहुल द्रविडचा विक्रम विराट कोहली मोडणार का?

भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडचा एक विक्रम मोडण्याची संधी भारताचा कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 4:48 PM

Open in App
ठळक मुद्देया मालिकेमध्ये भारताकडून फक्त कोहलीची फलंदाजी चांगली झाली आहे. अन्य फलंदाजांना मात्र या सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही.

नवी दिल्ली, भारत विरुद्ध इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना शुक्रवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यात बरेच विक्रम मोडण्याची शक्यता आहे. भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडचा एक विक्रम मोडण्याची संधी भारताचा कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात असेल.

या मालिकेमध्ये भारताकडून फक्त कोहलीची फलंदाजी चांगली झाली आहे. अन्य फलंदाजांना मात्र या सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळेच कोहलीला या सामन्यात द्रविडचा विक्रम मोडण्याची नामी संधी असेल.

कोहलीने आतापर्यंत कसोटी मालिकेतील चार सामन्यांमध्ये 544 धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्याच्या घडीला द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने 2002 साली झालेल्या इंग्लंडच्या दौऱ्यात 602 धावा केल्या होत्या. सध्याच्या घडीला कोहली द्रविडपेक्षा 59 धावांनी पिछाडीवर आहे. जर कोहलीने या धावा केल्या तर इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो.

टॅग्स :विराट कोहलीराहूल द्रविडभारत विरुद्ध इंग्लंड