मुंबई, भारत विरुद्ध इंग्लंड : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे पुरुष खेळाडूंना जमले नाही, ते एका महिलेने करून दाखवल्याची गोष्ट आज घडली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज दुसरा ट्वेन्टी-20 सामना खेळवला गेला. या सामन्यात हा विश्वविक्रम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
इंग्लंडची यष्टीरक्षक सारा टेलरने या सामन्यात एक अनोखे अर्धशतक पूर्ण केले. साराने पुनम राऊतला यष्टीचीत केले. आतापर्यंत ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 50 फलंदाजांना यष्टीचीत करणारी सारा ही पहिली यष्टीरक्षक ठरली. आतापर्यंत एकाही यष्टीरक्षकाला ही कामगिरी करता आलेली नाही. पुरुषांमध्ये महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत 34 फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. पुरुषांमध्ये सर्वाधिक स्टंपिंग धोनीच्या नावावर आहेत.
सर्वाधिक स्टंपिंग करणारे विकेटकीपर50- सारा टेलर (इंग्लंड, महिला)42- एलिसा हेली (ऑस्ट्रेलिया, महिला)39- बतूल फातिमा (पाकिस्तान, महिला)34- मैरिसा एग्युलेरिया (वेस्टइंडीज, महिला)34- महेंद्र सिंह धोनी (भारत, पुरुष)32- कामरान अकमल (पाकिस्तान, पुरुष)
भारतीय महिला संघाने सोमवारी दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंड संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचे 162 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट्स राखून पार केले. मराठमोळी स्मृती मानधनाने ( 63) पुन्हा एकदा विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार मिताली राजने ( 47*) आणि पूनम राऊत (32) यांनीही उपयुक्त खेळी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड महिला संघाला 161 धावांवरच समाधान मानावे लागले. पहिल्या वन डे सामन्यातील पराभवानंतर मालिकेत कमबॅक करण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील होता. मात्र, त्यांना संपूर्ण 50 षटकंही खेळता आली नाही. नॅटली स्किव्हर ( 85) हीने एकाकी झुंज दिली आणि त्यामुळे इंग्लंडला 161 धावांपर्यंत मजल मारता आली. झुलन गोस्वामी ( 4/30) आणि शिखा पांडे ( 4/18) या जलदगती गोलंदाजांनी इंग्लंडची फलंदाजी खिळखिळीत केली. त्यांना पूनम यादवने ( 2/28) चांगली साथ दिली. भारतीय जलदगती गोलंदाजांनी एकूण 8 विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच, प्रथमच भारताच्या दोन गोलंदाजांनी एका सामन्यात प्रत्येकी चार विकेट्स घेत्या आहेत.