Join us

धोनी आणि पंतच्या तुलनेवर गांगुलीचं आश्चर्यकारक विधान, माहीचे फॅन्स होतील नाराज!

sourav ganguly on rishabh pant: भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतनं (Rishabh Pant) भारतीय संघात (Team India) पदार्पण केल्यापासूनच त्याची टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या तुलना केली गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 16:17 IST

Open in App

भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतनं (Rishabh Pant) भारतीय संघात (Team India) पदार्पण केल्यापासूनच त्याची टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या तुलना केली गेली आहे. पंतनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यावेळी धोनी देखील भारतीय संघाकडून खेळत होता. वनडे आणि टी-२० मध्ये पंतला यश प्राप्त झालं नसलं तर कसोटी क्रिकेटमध्ये पंतनं शानदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पंतनं केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर बीसीसीआयचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं त्याचं भरभरुन कौतुक केलं आहे. 

"पंत आणि धोनीच्या तुलनेचं स्वरुप काहीही असलं तरी पंत आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाकडून कोणताही सामना खेचून आणण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आहे", असं विधान गांगुलीनं केलं आहे. 

'एबीपी लाइव्ह बंगाली' या टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गांगुली बोलत होता. "रिषभ पंत हा जवळपास धोनीसारखाच खेळाडू आहे. तो सामना जिंकणारा खेळाडू आहे. तो विरोधी संघाच्या हातात असलेला सामना केव्हाही खेचून आणू शकतो. तो अविश्वसनीय फटके लगावतो. पंत आपल्या संघाला सामना जिंकविण्याची जिद्द ठेवतो. मग तो कसोटी सामना असो, एकदिवसीय असो किंवा मग टी-२०. तो काही मिनिटांत सामन्याचं रुप पालटू शकतो", असा कौतुकाचा वर्षाव गांगुलीनं पंतवर केला.  

टॅग्स :सौरभ गांगुलीरिषभ पंतमहेंद्रसिंग धोनीभारत विरुद्ध इंग्लंड